"मुंबईकरांसाठी मी अहंकारी..जे जनतेच्या हिताचं तेच मी करेन." - uddhav thackeray addresses maharashtra people speaks mumbai metro car shed  | Politics Marathi News - Sarkarnama

"मुंबईकरांसाठी मी अहंकारी..जे जनतेच्या हिताचं तेच मी करेन."

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 डिसेंबर 2020

उद्धव ठाकरे म्हणाले, "माझा अहंकार आहे की कर्तव्य आहे, ते जनतेला माहित आहे.

मुंबई :"मुंबईकरांसाठी मी अहंकारी आहे. जनतेच्या हिता जे योग्य तेच मी करेल," असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे आज समाजमाध्यमांवरुन राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. कांजूरमार्ग मेट्रो शेडसाठी विरोध केला जात आहे. विरोधीपक्ष हा विषय प्रतिष्ठेचा करीत आहे. एकमेंकांचे प्रकल्प अडविण्याचा कद्रुपणा करू नका, हा प्रकल्प तुमच्या आमच्या अंहकारासाठी नाही, तर जनतेच्या हितासाठी आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "माझा अहंकार आहे की कर्तव्य आहे, ते जनतेला माहित आहे. कांजूरमार्ग मेट्रोसाठी केंद्र सरकार न्यायालयात गेले. बीकेसीची जागा राज्याची आहे. ही जागा आम्ही केंद्राला दिली. त्यावेळी कोणतीही खळखळ केली नाही. ही जागा केंद्र किंवा राज्याची नव्हे तर जनतेची जागा आहे. त्यांच्या वापरावरून राजकारण करू नये. आपण जनेतेचे सेवक आहोत. हे लक्षात घेऊन जनतेच्या हितासाठी काम केलं पाहिजे. 

ठाकरे म्हणाले की पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिले तर कांजूरजी जागा ही गवताळ प्रदेश, ओसाड जागा आहे. या ठिकाणी 3,4 आणि 6 मार्गासाठी मेट्रोकारशेड केले जाणार आहेत. याच ठिकाणाहून मेट्रो 14 ही थेट अंबरनाथ, बदलापूर येथे जाणार आहे. याचा फायदा लांब राहणाऱ्या प्रवासांना होणार आहे. आरे येथे प्रकल्प केला तर ती जागा पुढील पाच वर्षात कमी पडेल. कांजूर मार्ग येथे कारशे़ड केलं तर पन्नास वर्षांपर्यंत त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल.  

आपण मेट्रो ३ साठी आरे कारशेड करत होतो. त्या ठिकाणी ३० हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी ५ हेक्टर जागेमध्ये घनदाट जंगल होतं. २५ हेक्टर जागा ही आपल्याला कमी पडणार होती. त्यानंतर आपल्याला जंगल मारत मारत ही जागा कमी वाढवावी लागली असती. म्हणून त्या ठिकाणी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख