बाळ मानेंना मतांमधून उत्तर मिळेल - उदय सामंत

नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत भाजपचे बाळ माने यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत विरुद्ध नवीन शिवसैनिक अशाच निवडणुका सुरू आहेत. सामंत यांच्या कार्यपद्धतीमुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते
Uday Samant - Bal Mane
Uday Samant - Bal Mane

रत्नागिरी :  बाळासाहेब माने हे तालुक्‍यापुरते मर्यादित नाहीत. जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चांगले काम केले; मात्र काहींनी षड्‌यंत्र रचून त्यांना बाजूला केले. ग्रामपंचायत निवडणुकीची सगळी सूत्रे त्यांच्याकडे असती तर काही ठिकाणी भाजपला यश मिळाले असते. काम न करणाऱ्यांना पदे दिली जातात ही फार मोठी खदखद मनामध्ये आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मनोमिलन घडवण्यासाठी बाळासाहेबांचा उपयोग निवडणुकीपुरता केला जात आहे हे त्यांनी ओळखावं, एवढीच विनंती आहे, असा सल्ला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला.

शिवसैनिक १८ तारखेला मतातून त्यांना उत्तर देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत भाजपचे बाळ माने यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत विरुद्ध नवीन शिवसैनिक अशाच निवडणुका सुरू आहेत. सामंत यांच्या कार्यपद्धतीमुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या नाराजांना मी पाठिंबा देऊन जास्तीत जास्त ग्रामपंचायती घेणार, असे वक्तव्य बाळ माने यांनी केले होते. 

याला प्रत्युत्तर देताना उदय सामंत म्हणाले, जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करत असताना बाळ माने यांना काहींनी षडयंत्र रचून बाजूला केले. त्याचा फायदा आम्हाला जिल्ह्यात होत आहे. बाळासाहेब मानेंवर प्रेम करणारे भाजपमधील अनेक कार्यकर्ते जिल्ह्यात आमच्याबरोबर आहेत. बाळासाहेब माने हे माझे चांगले मित्र असून अनेकवेळा मी त्यांचा सल्ला घेतला आहे,''

सामंत पुढे म्हणाले,  "ग्रामपंचायत निवडणुकीची सगळी सूत्रे त्यांच्याकडे असती तर काही ठिकाणी भाजपला नक्की यश मिळाले असते. कालची पत्रकार परिषद त्यांच्या मनाविरुद्ध होती हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. त्यांनी माझ्यावर टीका केली, अजिबात राग आला नाही. कारण ते नाइलाजाने माझ्याविरोधात बोलले हे मला माहित आहे. आजूबाजूच्या पदाधिकाऱ्यांना बर वाटावं म्हणून ते बोलले असावेत. मी बाळ मानेंचं मन ओळखू शकतो,''
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com