ट्वीटरवर चर्चा संजय राऊतांच्या 'डिलीट' ट्वीटची - Tweeter followers making mockery of Sanjay Raut's Deleted tweet | Politics Marathi News - Sarkarnama

ट्वीटरवर चर्चा संजय राऊतांच्या 'डिलीट' ट्वीटची

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले खरे. परंतु, चर्चा मात्र या मूळ ट्वीटपेक्षा त्यांनी याच विषयावर आधी केलेल्या आणि नंतर डिलीट केलेल्या ट्वीटची झाली

मुंबई : काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले खरे. परंतु, चर्चा मात्र या मूळ ट्वीटपेक्षा त्यांनी याच विषयावर आधी केलेल्या आणि नंतर डिलीट केलेल्या ट्वीटची झाली. आधीचे ट्वीट का डिलीट केले असे विचारत ट्वीटकऱ्यांनी संजय राऊतांवर प्रश्नांचा भडिमार केला. 

अहमद पटेल गेले. काँग्रेस आणि गांधी कुटुंबास अत्यंत गरज असतानाच ते गेले. पक्ष निष्ठेची पाठशाळा म्हणजे अहमद पटेल. काँग्रेसचा एक मजबूत स्तंभ कोसळून पडला. एक विनम्र नेत्यास माझी विनम्र श्रध्दांजली. अहमद भाई आपने ये क्या किया?...असे ट्वीट राऊत यांनी केले होते. 

त्या अगोदर....
अत्यंत दुःखद आणि धक्कादायक. आज खरी गरज असताना अहमद पटेल सोडून गेले. काँग्रेसचा भक्कम स्तंभ कोसळळा. अहमदभाई ये आपने क्या किया. एका विनम्र नेत्याला विनम्र श्रद्धांजली....असे ट्वीट राऊत यांनी केले होते...ते नंतर त्यांनी डिलीट केले. 

त्यावर

हे आधीचे ट्वीट...
त्यात "काँग्रेस आणि गांधी कुटुंब" हा उल्लेख नाही
असा बदल का?

असा प्रश्न एका ट्वीटकऱ्याने विचारला...

तर....

....हे ट्वीट डिलीट करायच खर कारण काय हे सांगायची गरज नाही..! अहमद पटेल यांची खरी गरज आज काँग्रेसला नाही तर महाराष्ट्रातील निकम्म्या उद्धव सरकार ला होती..! त्यामुळेच हे दुःख झालेल दिसतय..! अशी खिल्ली दुसऱ्या एकाने उडवली.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख