तीन व्हॉट्सअॅप कॉलमुळे एनआयए पोहोचले वाझेपाशी - Three Whats app Calls Helped NIA to Reach upto Sachin Waze | Politics Marathi News - Sarkarnama

तीन व्हॉट्सअॅप कॉलमुळे एनआयए पोहोचले वाझेपाशी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

मनसुख हिरेन यांच्या मोबाईलवर आलेल्या तीन व्हॉट्सअॅप कॉलमुळे संबंधित प्रकरणाचा गुंता सोडवण्यात एनआयए तपास यंत्रणेला यश आले आहे. त्यामार्फत पोलिस बुकी नरेश गोर, विनायक शिंदे व सचिन वाझेपर्यंत पोहोचू शकले. 

मुंबई : मनसुख हिरेन  Mansukh Hiren यांच्या मोबाईलवर आलेल्या तीन व्हॉट्सअॅप कॉलमुळे संबंधित प्रकरणाचा गुंता सोडवण्यात एनआयए NIA तपास यंत्रणेला यश आले आहे. त्यामार्फत पोलिस बुकी नरेश गोर, विनायक शिंदे व सचिन वाझेपर्यंत पोहोचू शकले. Three Whats app Calls Helped NIA to Reach upto Sachin Waze

हत्येपूर्वी मनसुख हिरेन यांना घरी दूरध्वनी आला होता. त्या वेळी त्यांचा फोन घरी असल्यामुळे वायफायला कनेक्टेड होता. त्यातील डेटाची पडताळणी केली असता तीन क्रमांक गुजरातमधील असल्याचे निष्पन्न झाले. 

त्यांच्या माध्यमातून दहशतवादविरोधी पथक प्रथम बुकी नरेश गोरपर्यंत पोहोचले. त्याच्या चौकशीत विनायक शिंदे आणि सचिन वाझे Sachin Waze यांची नावे पुढे आली. त्यातील एका दूरध्वनीचे लोकेशन अंधेरीतील Andheri चकाला परिसरातील होते. त्यामुळे एनआयएने अंधेरी परिसरातही शोधमोहीम राबवली होती.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा घटनाक्रम घटनास्थळी जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या एनआयए करत आहे. त्यासाठी सोमवारी सीएसएमटी CSMT Railsay Station रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक चार आणि पाचवर सचिन वाझे यांना नेऊन ४ मार्चच्या रात्री काय घडले होते, याची नेमकी माहिती ‘एनआयए’च्या NIA अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझे याने ४ मार्च रोजी सीएसएमटी ते कळवा प्रवास लोकलने केला होता. त्या वेळी वाझे याला कळव्यालाही नेण्यात आल्याचे समजते. Three Whats app Calls Helped NIA to Reach upto Sachin Waze

सीसी टीव्ही फूटेजमध्ये मिळालेले सचिन वाझे याचे चालणे-फिरणे आहे तसे असल्याचे समोर आले आहे. त्या माध्यमातून एनआयए अँटिलिया स्फोटक प्रकरण Antilia Bomb Case आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याकरिता सचिन वाझेला प्रत्येक स्पॉटवर नेण्यात येत आहे. त्या वेळी एनआयएसोबत पुण्याच्या Pune सेंट्रल फॉरेन्सिक Forensic सायन्स लॅबोरेटरीची टीमही हजर होती. त्या पथकाने काही ठिकाणचे नमुने गोळा केले आहेत. एनआयएने वाझेची स्पोर्टस् बाईक जप्त केली असून, तिचेदेखील नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने घेतले आहेत. दरम्यान, एनआयएचे एक पथक दमनला रवाना झाले असूल, त्या ठिकाणी कसून चौकशी आणि झाडाझाडती सुरू आहे.

उपायुक्ताची चौकशी
अँटिलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची चौकशी केली. सचिन वाझे याच्यासोबत योगायोगाने झालेल्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याचा गुन्ह्यात सहभाग नसून केवळ माहिती घेण्यासाठी त्याला बोलावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.Three Whats app Calls Helped NIA to Reach upto Sachin Waze

सचिन वाझे याच्या अटकेनंतर एनआयएने स्फोटक प्रकरणाचा घटनाक्रम जाणून त्याबाबत पुरावे गोळा केले आहेत. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या हत्येचा पूर्ण घटनाक्रम एनआयए जाणून घेत आहे. त्यासाठी एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची मंगळवारी चौकशी करण्यात आली. वाझे व त्याची पोलिस आयुक्तालयात ३ मार्चला भेट झाली होती. त्याबाबतची माहिती एनआयएने घेतली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख