Taking the side of Rahul Gandhi, Nitin Raut gave this answer to Sharad Pawar! | Sarkarnama

राहुल गांधींची बाजू उचलत नितीन राऊतांनी शरद पवारांना दिले हे उत्तर ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

श्री. पवार यांच्या मनात कॉंग्रेसबद्दल आपुलकी आहे पण, मग राहुल गांधींच्या बद्दल ते तसं कोणत्या संदर्भात बोलले काय माहिती !

मुंबई : कॉंग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनबाबत व्यक्त केलेली चिंता मूलभूत प्रश्नांबाबत आहे असे स्पष्ट करतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संरक्षण मंत्री असताना काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं असे जोरदार उत्तर कॉंग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. 

भारत-चीनच्या संघर्षाबाबत राहुल गांधी हे मोदी सरकारवर दररोज टीकास्त्र सोडत आहे. मात्र, या मुद्यावर श्री. पवार यांनी भारत आणि चीन यांच्या सीमेवरून झालेल्या कराराची आठवण करीत दोन वेळा राहुल यांना सल्ला दिला होता.

याबाबत राऊत यांनी आता थेट श्री. पवार यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की श्री. पवार यांच्या मनात कॉंग्रेसबद्दल आपुलकी आहे पण, मग राहुल गांधींच्या बद्दल ते तसं कोणत्या संदर्भात बोलले काय माहिती ! त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रसार माध्यमांना सामोरे जायचा सल्ला दिला पाहिजे होता. 

श्री. पवार यांनी विसरायला नको की 1962 च्या युद्धावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती, देश शस्रसज्ज होत होता. यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते, इंदिराजींनी 1971 चं युद्ध जिंकले होतं हे पण श्री. पवार यांना आठवलं असते तर बरं झाले असतं. ते संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं श्री. पवार कॉंग्रेसमध्येच तयार झालेलं नेतृत्व आहे 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख