सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणाचा तपास योग्य दिशेने : परमबीर सिंह  - Sushant Singh's suicide case being investigated in the right direction: Parambir Singh | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणाचा तपास योग्य दिशेने : परमबीर सिंह 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

या प्रकरणाची माहिती देताना सिंह म्हणाले, की आतापर्यंत या केसमध्ये लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सविस्तर चौकशी केली आहे.

मुंबई : "" एखाद्या राज्यात घटना घडली असेल तर त्याचा तपास त्याच राज्याचे पोलीस करतात. याबाबत आम्ही अधिक कायदेशीर माहिती घेत आहोत. मुंबई पोलीस, वांद्रे पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी यांनी दिली आहे. 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी अभिनेता सुशातसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणावर भाष्य केले. या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. बिहारमधील सर्वच पक्षांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली आहे. 

या प्रकरणाची माहिती देताना सिंह म्हणाले, की आतापर्यंत या केसमध्ये लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सविस्तर चौकशी केली आहे. आर्थिक, आरोग्यविषयक तसंच इतर सर्व बाबीच्या बाजूने तपास सुरू आहे. चौकशी काळात सुशांतचे वडील, बहिण, मेहुणा याचे जबाब घेतले आहेत.

त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. मात्र त्यानंतर त्याच्या वडीलांनी नंतर बिहारमध्ये तक्रार दाखल केली.त्यांच्यावर उपचार आणि व्यावसायिक दडपणामुळे आत्महत्या केली असावी अशी आमची माहिती असल्याचही सिंह यांनी सांगितले 

13 अणि 14 जूनचे बिल्डींगचे सीसीटीव्ही फूटेज चेक केले आहेत पण, पार्टीबाबत कोणतेच पुरावे आढळले नाहीत असे परमबीर सिंह यांनी सांगितले. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण राष्ट्रीय मुद्दा बनत चालला असून महाराष्ट्र आणि बिहारमध्येही कलगीतुरा सुरू आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस योग्य पद्धतीने करीत आहेत. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरजच नाही असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

मात्र बिहारमधील भाजप, जेडीयू , राजद आणि कॉंग्रेससह सर्वच लहानमोठे पक्ष आता सुशांत आत्महत्याप्रकरणी प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. 

सीबीआय चौकशीची मागणी
आज बिहार विधानसभेत भाजप आमदारांने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली असता या मागणीला भाजपचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जाणारे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पाठिंबा दिला आहे. 

या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी बिहारचे आयपीएस अधिकारी मुंबईत आले असता त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याने तर चर्चेला उधानच आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांत आत्महत्याप्रकरणी आता अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आज ट्‌विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अमृता फडणवीस म्हणाल्या, की या प्रकरणाचा ज्या पद्धतीने तपास सुरू आहे. त्यावरून मला वाटते की मुंबईने माणूसकी गमावली आहे. निदोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबई आता सुरक्षित राहिली नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख