गुजरातला गरबा बंद, मग महाराष्ट्रात मागणी कशाला? तटकरेंचा भाजपला सवाल

गुजरातला गरबा खेळायची परवानगी नसताना महाराष्ट्रात गरबा खेळायची मागणी कशाला करता असा सवाल करीत खासदार सुनिल तटकरे यांनी भाजप वर निशाणा साधला. सध्या राज्य कोरोना महामारीशी लढा देत असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेऊन कोणता खेळ खेळत आहेत, असा सवालही त्यांनी केला.
Sunil Tatkare
Sunil Tatkare

म्हसाळा : गुजरातला गरबा खेळायची परवानगी नसताना महाराष्ट्रात गरबा खेळायची मागणी कशाला करता असा सवाल करीत खासदार सुनिल तटकरे यांनी भाजप वर निशाणा साधला. सध्या राज्य कोरोना महामारीशी लढा देत असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेऊन कोणता खेळ खेळत आहेत, असा सवालही त्यांनी केला. 

येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तटकरे बोलत होते. निसर्ग चक्रीवादळात तात्काळ मदत केली म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचे खासदार सुनील तटकरे यांनी आभार मानले त्याचबरोबर विद्युत विभागाने मोठ्या परिश्रमाने वादळात खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत केला त्याबद्दल विद्युत विभागाचे सुद्धा आभार मानले. 

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे छातीठोकपणे सांगणारे आणि पवार साहेबांचा पक्ष राहणार नाही असे भाकित करणारे आता कुठे आहेत हे राज्यातील जनता पाहत आहे. महाविकास आघाडीची मोट बांधत पवार साहेबांनी साऱ्या देशाला थक्क करीत महाराष्ट्रातील जनतेला एक प्रकारे सुखद धक्का दिला आहे. कोरोनाचे संकट असतानाही महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे याचे पोटशूळ विरोधी बाकांवर बसलेल्यांना येत असून नेहमीच राज्य सरकारला डिवचण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे असेही खासदार तटकरे म्हणाले.

नुकताच केंद्र सरकारने जाहीर केलेला कामगार कायदा व कृषी विधेयक घातक असून राज्यात बेरोजगारी वाढेल व शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत राहिली आहे आणि भविष्यातही शेतकर्‍यांच्या हिताचेच निर्णय घेणार असे खासदार तटकरे यांनी सांगितले. 

म्हसळा तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नांसंदर्भात व ग्रामीण रुग्णालयातील सोयी सुविधांच्या बाबतीत तालुक्यातील पत्रकारांनी माझी भेट घेऊन प्रश्न मांडले असता मी राज्याचे आरोग्य मंत्री यांच्यासोबत चर्चा केली असून काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे तालुक्यातील पत्रकारमित्र आणि संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत काही समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

त्याच बरोबर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या संदर्भात देखील संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांचेसोबत चर्चा केली असून येणाऱ्या कालखंडात हे रस्ते देखील सुस्थितीत केले जातील. त्याचबरोबर भविष्यात या मतदारसंघाच्या आमदार आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्याकडे पर्यटन राज्यमंत्री हे खाते असल्यामुळे या सर्व परिसरात धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन व इतर खात्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या विकासात्मक योजना राबवून येथील तरुणांना याचठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल असे खासदार तटकरे यांनी आश्वासित केले.

''श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेच्या मतरुपी आशीर्वादाने आमदार झाली आणि आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने राज्याची राज्यमंत्री झाले असून सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक बांधणीत पक्ष वाढीसाठी विशेष लक्ष देत असतानाच राज्य सरकार मधील मंत्री म्हणून या सर्व परिसरात अधिकाधिक विकासात्मक धोरण राबवून तरुणांसाठी विविध प्रकारच्या योजना अंमलात आणून अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत,'' असेसराज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com