मराठी माणसाची हक्काची शिवसेना 55 वर्षांची झाली.. - shivsena which founded for rights of marathi manus turns 55 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मराठी माणसाची हक्काची शिवसेना 55 वर्षांची झाली..

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 18 जून 2021

कोरोनामुळे कार्यक्रमावर निर्बंध... 

मुंबई : शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन १९ जून रोजी साजरा होणार आहे. कोरोनामुळे यंदाही शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबरोबरच आगामी महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shivsena turns 55 years)

सर्व शिवसैनिकांनी शाखांमध्ये सकाळी जमून सध्याच्या परिस्थितीला अनुसरून सामाजिक कार्यक्रम करावे, असे कळविण्यात आले आहे. ठाकरे यांनी वेळोवेळी आगामी सर्व निवडणुका सोबत लढविण्याचे आवाहन महाआघाडीला केले आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तिन्ही पक्षांनी सोबत निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली आहे; मात्र कॉंग्रेसने आगामी सर्व निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे महायुतीसोबतच्या विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या आगामी वाटचालीबाबत काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे वर्षभरापासून रखडलेल्या काही महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, तर फेब्रुवारी महिन्यात मुंबई, ठाण्यासह महत्त्वाच्या महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी शिवसेनेची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पक्ष कार्यालयाचे आज उद्‍घाटन
मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नव्या पक्ष कार्यालयाचे उद्या (ता. १९) सकाळी ११ वाजता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. महानगरपालिकेच्या जुन्या (हेरिटेज )इमारतीत हे कार्यालय तयार करण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख