Arvind Sawant
Arvind Sawant

शिवसेना नेत्याला काँग्रेसकडून आहे 'ही' अपेक्षा

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याबाबत राजकारण करण्याची घाई नको. औरंगजेब तुमचा आदर्श आहे का याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केले

मुंबई : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याबाबत राजकारण करण्याची घाई नको. औरंगजेब तुमचा आदर्श आहे का याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केले. नामकरणाचे काम कोरोनामुळे राहिले होते. पण आता ते होईल, असेही ते म्हणाले.

औरंगाबादच्या नामकरणावरुन काँग्रेस व शिवसेनेत धुसफूस सुरु आहे. भाजपही याचा फायदा उठवतो आहे. याबाबत बोलताना सावंत म्हणाले, "शिवसेना प्रमुखांनी १९८८ साली संभाजीनगर हे नाव घोषित केले. तेव्हापासून लढा सुरू आहे,. शासनाकडून मान्यता द्यायची होती, ती झाली नाही. पण आता उद्धव साहेब मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता नामकरणाची मागणी जोर धरु लागली आहे. दिल्लीत दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे नांव रस्त्याला दिले. आता  औरंगाबादला संभाजीनगर हे नांव देणे उचित होईल,"

शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना सावंत म्हणाले, "शेतकरी आंदोलनपूर्वी एक मृत्यू झाल्यावर सभागृह बंद पडायचे. पण आता इतक्या लोकांच्या आत्महत्या होत आहेत, इतके मोठे आंदोलन सुरू आहे. पण त्यावर काही होत नाही. आडमुठेपणाची भूमिका घेऊन शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणं निंदाजनक आहे. याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर काही कमीपणा येणार नाही. नव्यानं काही करता येईल का पाहावं,"

शिवसेनेने गुजराती समाजाला आकृष्ठ करुन घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यावरुन भाजपने त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. याबाबत बोलताना सावंत म्हणाले, "आत्ता सुद्धा रायगड , पालघरचा आमचा जिल्हा प्रमुख गुजराती आहे. सेनेत खूप आधीपासून बरेच गुजराती बांधव आहेत. अनेक उपक्रमांत ते सहभागी असतात. जातपात, प्रांत हा सेनेचा विषय नाही. खऱ्या अर्थाने संविधानाला धरून काम करणारी शिवसेना ही संघटना आहे.''
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com