नाना पटोलेंमध्ये शिवसेनेची आक्रमकता उतरतेय.... - Shivsena Leader Arvind Sawant Comments about Nana Patole | Politics Marathi News - Sarkarnama

नाना पटोलेंमध्ये शिवसेनेची आक्रमकता उतरतेय....

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार याचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार याचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोलेंमध्ये शिवसेनेचे संस्कार ( आक्रमकता) उतरते आहे, असे अरविंद सावंत म्हणाले आहेत.

पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर आकाशाला भिडले आहेत. देशात जेव्हा मनमोहन सिंह यांचं सरकार होतं, त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने टिका करायचे. आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये महागाईने जनता हवालदिल झाली असताना त्यांची टिव टिव का बंद झाली, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांपूर्वी केला होता . अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे किंवा त्याचे शूटींग आता आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना या अभिनेत्यांना जनतेवरचा अन्याय, अत्याचार दिसत होता. त्यावर टिका करताना ते फार टिव टिव करायचे. आता नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांवर, सामान्य जनतेवर दररोज अत्याचार करीत आहे. आता या अभिनेत्यांना तो दिसत नाहीये का? मोदी सरकारच्या अत्याचाराच्या विरोधातही या अभिनेत्यांनी आता आवाज उचलावा आणि जनतेच्या बाजूने उभे रहावे, अन्यथा महाराष्ट्रात त्यांचे सिनेमे आणि शूटींग होणार नाही, याची पूर्ण व्यवस्था आम्ही करू, असा सणसणीत इशारा नाना पटोलेनी दिला आहे. त्यावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. 

शिवजयंतीच्या निमित्ताने बोलताना ते म्हणाले, "शिवाजी महाराज देशाचं आराध्यदैवत त्यांनी स्वराज्याची संकल्पना दिली. देश एकत्र करावा म्हणून सगळ्यांना एकत्र आणले. शेतकऱ्यांच्या केसांना सुद्धा धक्का लागता काम नये, असे ते सांगत असत. मात्र केंद्र सरकारला कोणताच खेद होत नाही. उद्धव ठाकरे सरकार ज्याप्रमाणे प्रशासन चालवत आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे. हे सरकार तीन लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना देणार आहे,"

''टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात रितसर कायदेशीर चौकशी होईल. कोणी संजय राठोड यांचे अकारण चारित्र्यहनन करु नये. चौकशी करणे हे पोलिसांचे काम आहे. ते काम पोलिस करतील. माध्यमांनी जबाबदारीने वागले. पुछता हे भारतच काय झालं? याचे उत्तर माध्यमांनी द्यावे,'' असेही सावंत म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख