सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतेही काम करीत नाही! अनिल परब यांची टीका - Shivsena Leader Anil Parab Criticize MNS | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतेही काम करीत नाही! अनिल परब यांची टीका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतेही काम करत नाही. त्यांचे अस्तित्व त्यावरच आहे, अशा शब्दांत परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी मनसेवर टीका केली. मनसेने वाढीव वीजबिलाविरोधात छेडलेल्या आंदोलनावरून अॅड. परब यांनी हा हल्ला चढवला आहे.परब यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपचाही समाचार घेतला. 

मुंबई  : सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतेही काम करत नाही. त्यांचे अस्तित्व त्यावरच आहे, अशा शब्दांत परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी मनसेवर टीका केली. मनसेने वाढीव वीजबिलाविरोधात छेडलेल्या आंदोलनावरून अॅड. परब यांनी हा हल्ला चढवला आहे.परब यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपचाही समाचार घेतला. 

सरकार जाईल ही स्वप्न बघतच भाजपला पाच वर्षे काढायची आहेत. त्यानंतरही त्यांचा स्वप्नभंग होणार आहे. सत्तेविना ते अस्वस्थ झाले आहेत. कार्यकर्ते बिथरू नये म्हणून त्यांना हे बोलावे लागते, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्‍तव्याचाही समाचार त्यांनी घेतला. "शरद पवार कोठे, त्यांचे कर्तृत्व कुठे आणि पडळकर कोठे? कोणावरही टीका करताना स्वत:कडे पाहावे. वयाच्या ३६ व्या वर्षी पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. हे असे बोलणारे भाजपच्या संस्कारातले नाहीत, ही भेसळ आहे. ओरिजनल भाजपमधील असे बोलणार नाहीत,"असा टोलाही त्यांनी लगावला.

कठोर निर्णय घ्यावे लागतील!
पुन्हा लॉकडाऊन करावे या मताचे सरकार नाही; पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असेल तर सरकारलाही काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. रुग्णसंख्या कमी असली तरी कोव्हिडचे रुग्णालय बंद न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दळणवळण साधनांवर निर्बंध घालण्याबाबत पुढच्या पंधरवड्यात आकडेवारी पाहून निर्णय घेण्यात येईल, असेही अॅड. परब यांनी सांगितले..
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख