राज्य सरकारच्या प्रयत्नांना साथ द्या - शरद पवारांचे जनतेला आवाहन - Sharad Pawar Appeal to People of Maharashtra to Support Government in Corona Crisis | Politics Marathi News - Sarkarnama

राज्य सरकारच्या प्रयत्नांना साथ द्या - शरद पवारांचे जनतेला आवाहन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

''राज्यात कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत ज्या सूचना आल्या आहेत, त्या नजरेसमोर ठेऊन निर्णय घेतले जातात. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की राज्य सरकारच्या प्रयत्नांना आपल्या सर्वांचे सहकार्य मिळावे.'' असे आवाहन ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला केले. सर्व घटक अशा काळात अन्य सर्व गोष्टी बाजूला ठेऊन यंत्रणेला सहकार्य देतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

मुंबई : ''राज्यात Maharashtra कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत ज्या सूचना आल्या आहेत, त्या नजरेसमोर ठेऊन निर्णय घेतले जातात. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की राज्य सरकारच्या प्रयत्नांना आपल्या सर्वांचे सहकार्य मिळावे.'' असे आवाहन ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी जनतेला केले. सर्व घटक अशा काळात अन्य सर्व गोष्टी बाजूला ठेऊन यंत्रणेला सहकार्य देतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. Sharad Pawar Appeal to People of Maharashtra to Support Government in Corona Crisis

कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही कडक निर्बंध लादले आहेत. त्याला राजकीय पक्षांकडून व विविध व्यावसायिक वर्गाकडून विरोध होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज फेसबूक लाईव्हच्या Facebook माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात कोरोनाची स्थिती किती भयावह आहे हे दाखविण्यासाठी पवार यांनी मुंबई Mumbai, पुणे Pune, नागपूर Nagpur, नाशिक Nashik व औरंगाबाद Aurangabad या पाच शहरांतील सप्टेंबर २०२० ची स्थिती व आजची एप्रीलची स्थिती याची आकडेवारी मांडली.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, "एवढी भयावह स्थिती या पूर्वी कधी नव्हती. देशातल्या कुठल्याही राज्यात इतकी भयानक स्थिती नाही. सक्रीय रुग्णांची वाढ चिंताजनक बाब आहे. याला तोंड द्यायलाच हवे. दिवसेंदिवस स्थिती गंभीर होते आहे. गेल्या वर्षी आपण कोरोनाला उत्तम तोंड दिले. गेल्या वर्षीचा प्रादुर्भाव व आजची संख्या पाहिली तर आता वाढीचा वेग चिंताजनक आहे. राज्यातली आरोग्य यंत्रणेचे घटक डाॅक्टर Doctor, परिचारक, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कष्ट करताहेत. रुग्णांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. केंद्राचाही हा आग्रह आहे,'' Sharad Pawar Appeal to People of Maharashtra to Support Government in Corona Crisis

ते पुढे म्हणाले, '' आज या स्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार जसे प्रयत्न करते आहे. त्या प्रमाणे केंद्र सरकारसुद्धा या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी पूर्ण सहकार्य देते आहे.मी काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी Dr. Harshwardhan चर्चा केली. त्यांनी विश्वास दिली की पूर्ण ताकदीने आम्ही राज्यांच्या पाठीशी आहोत. आपल्याला सामुहिक प्रयत्नातून पुढे जायचे आहे. बंधने आणली की अस्वस्थतता येते. सर्व घटकांना या निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणावर झळ बसली आहे. शेतकऱ्याला आपल्या मालाचे काय करायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. शेतकऱ्यांचेही अपरिमित नुकसान होते आहे. यशाचा मार्ग काढायचा असेल तर या सगळ्या परिस्थितीला धैर्याने, सामुहिक पणाने सामोरे गेलेच पाहिजे. त्याला पर्याय नाही,''

माझी सगळ्या घटकांना विनंती आहे की वास्तव नाकारू नका. काही कठोर निर्णय राज्याला घ्यावे लागतील व घेतले जात आहेत, असेही पवार म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख