सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : प्रसिद्ध अभिनेत्याला लवकरच समन्स? - Seven More Celebrity on NCB Radar | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : प्रसिद्ध अभिनेत्याला लवकरच समन्स?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असताना अमली पदार्थ सेवनाचा प्रकार समोर आल्यानंतर एनसीबी करीत असलेल्या तपासाला आता अधिक वेग आला आहे. एनसीबी लवकर चार्जशीट दाखल करणार आहे. सध्या काही बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध व्यक्ती एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यापैकी काही जणांची आता चौकशी सुरू आहे

मुंबई  : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनसीबी) रडावर सात आणखी सेलेब्रिटी आले आहेत. त्यातील एकाला लवकरच समन्स पाठवण्यात येणार आहे. सध्या याप्रकरणी एनसीबी धर्मा प्रॉडक्‍शनच्या क्षितिज प्रसादची चौकशी करत आहे.

निर्माता व दिग्दर्शक करण जोहर याने २०१९ मध्ये आयोजित केलेल्या एका पार्टीची चित्रफित मिळाल्यानंतर ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवली होती. त्यानुसार, त्याचा अहवाल मिळाला असून त्यात कोणतीही छेडछाड करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. क्षितिज प्रकाशला जेव्हा एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले, तेव्हा त्याच्या घरातून गांजा ओढण्यासाठी वापरण्यात येणारे रोल सापडले होते. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असताना अमली पदार्थ सेवनाचा प्रकार समोर आल्यानंतर एनसीबी करीत असलेल्या तपासाला आता अधिक वेग आला आहे. एनसीबी लवकर चार्जशीट दाखल करणार आहे.

सध्या काही बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध व्यक्ती एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यापैकी काही जणांची आता चौकशी सुरू आहे. एका अभिनेत्याला लवकरच समन्स पाठवण्यात येणार आहे. यापूर्वी दीपिका पदुकोण, सारा अली खानसह काही अभिनेत्रींची याप्रकरणी एनसीबीने चौकशी केली होती. याप्रकरणी आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्‍यता आहे. एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना यांची एनसीबीच्या अधिका-यांसह बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

एनसीबीच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, पथकाला या प्रकरणात उर्वरीत संशयितांबाबतही तपास करण्यास सांगितले आहे. जवळपास पाच तास ही बैठक झाली. त्यानंतर राकेश अस्थाना यांनी या प्रकरणाचा तपास करणा-या टीमला सहा महिन्यांत चार्जशीट दाखल करण्यास सांगितले आहे.

अभिनेत्रीच्या बॅंक खात्याची होणार तपासणी
एनसीबीने चौकशी केलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत यांचे मोबाईल फोन जप्त केले असून, आवश्‍यकता निर्माण झाल्यास त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या बॅंक खात्याची गेल्या तीन वर्षातील व्यवहार तसेच इतर व्यवहारांची तपासणी करण्यास एनसीबीने सुरुवात केली आहे.

क्षितिजच्या आरोपांचे खंडन
चौकशीदरम्यान आपल्या मानसिक त्रास देण्यात आला, जबरदस्तीने जबाब नोंदवण्यात आला, तसेच ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोपी याप्रकरणी अटक आरोपी क्षितिज प्रसादने एनसीबीवर आरोप केला होता. एनसीबीने त्याचे खंडन केले आहे. क्षितिजवरील कारवाई कायदेशिरित्या करण्यात आली आहे. त्यात सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे. एनसीबी नियमाप्रमाणे हे प्रकरण हाताळत आहे. त्यामुळे धमकावण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे अधिका-याने स्पष्ट केले. आरोपीवर कोणाचेही नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला नसल्याचेही या अधिका-याने स्पष्ट केले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख