मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आज दुपारी १ वाजता दिल्ली शहराच्या सीमेवरील सिंघू परीसरात आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेवरून संजय राऊत आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. स्वतः राऊत यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत.@OfficeofUT @PawarSpeaks @AUThackeray
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 2, 2021
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला होता. तर राज्यसभेत विरोध केला होत. राऊत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. महाविकास आघाडीचे नेते या मोर्चाला उपस्थित होते. या मोर्चाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हे दोघेही या मोर्चाला उपस्थित राहिले नाहीत. आता दिल्लीत शेतकरी आंदोलकांना भेटून शिवसेना काय संदेश देणार याबाबत उत्सुकता आहे.
किसान आंदोलन झिंदाबाद!
will visit protesting farmers at Gazipur today at 1 pm..
जय जवान
जय किसान!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 2, 2021
भाजपचे केंद्रीय सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, अतिरेकी ठरवून मारत आहे. मधल्या काळात ‘बैठक-बैठक’ खेळण्याचा दमदार खेळ सुरूच आहे. या खेळात भाग घेणाऱ्या मंत्र्यांना आता अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार मिळायला हरकत नाही, अशी टीका शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून काही दिवसांपूर्वी केली होती.
Edited By - Amit Golwalkar

