संजय राऊतांचे ट्वीट सांगते.. राठोडांचा राजीनामा अटळ

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सूई वळली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधात असलेल्या भाजप आक्रमक झाला आहे. राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मानणारा एक गट खुद्द शिवसेनेतही आहे. राठोड यांच्याबाबत पुढे काय याबद्दल अद्याप मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्णय घेतलेला नाही.
Sanjay Rathod - Sanjay Raut
Sanjay Rathod - Sanjay Raut

पुणे  : टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात ज्यांच्यावर संशय घेतला जात आहे ते वन राज्यमंत्री संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा अटळ असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटवरुन दिसून येते आहे. सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन....असे सूचक ट्वीट राऊत यांनी केले आहे.

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सूई वळली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधात असलेल्या भाजप आक्रमक झाला आहे. राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मानणारा एक गट खुद्द शिवसेनेतही आहे. राठोड यांच्याबाबत पुढे काय याबद्दल अद्याप मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्णय घेतलेला नाही. राठोड यांनी गेले काही दिवस सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटायचा प्रयत्न केला. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या भेटीशिवाय उध्दव ठाकरे यांनी त्यांना भेटीची वेळ दिलेली नाही.

मुख्यमंत्र्यांनी वेळ न देणे हे पुरेसे बोलके मानले जाते आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उध्दव ठाकरे त्यांच्या विश्वासू मंत्र्यांविषयी या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत असेही समजते.या दरम्यान राठोड स्वत:हून पायउतार होतील तर बरे, असेही सांगितले जाते.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना राठोड यांच्यावरून शिवसेनेत दोन गट नसल्याचे सांगितले होते. ''मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राठोड यांच्या राजीनाम्याचा निर्णय सरकारमधील प्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील. त्यावरून शिवसेनेत कोणतेही गट नाहीत.'' असे राऊत यांनी सांगितले होते. 

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोप तसेच कोविडकाळात त्यांनी केलेले नियमांचे उल्लंघन या अत्यंत अयोग्य बाबी असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झाले असल्याचे विश्वसनीयरित्या समजते. त्यामुळे त्यांना लवकरच राजीनामा द्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. गेले काही दिवस ते `डेंजर झोन` मध्ये होते. मात्र विधीमंडळाचे अधिवेशन राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गाजणार असल्याने त्यांना राजीनामा देण्याचा निरोप दिल्याचे सांगण्यात येते आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com