अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवताना वाझे उपस्थित - Sachin Waze was present near Antilia while placing Scorpio Bomb | Politics Marathi News - Sarkarnama

अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवताना वाझे उपस्थित

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सुरुंगांच्या नळकांड्यांनी भरलेली स्काॅर्पिओ ठेवताना तिथे सचिन वाझे उपस्थित होता, अशी माहिती एनआयएच्या तपासात निष्पन्न झाली आहे. एका पोलिस चालकासह अन्य दोन चालकांच्या सहाय्याने ही स्काॅर्पिओ तेथे नेऊन ठेवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सुरुंगांच्या नळकांड्यांनी भरलेली स्काॅर्पिओ ठेवताना तिथे सचिन वाझे उपस्थित होता, अशी माहिती एनआयएच्या तपासात निष्पन्न झाली आहे. एका पोलिस चालकासह अन्य दोन चालकांच्या सहाय्याने ही स्काॅर्पिओ तेथे नेऊन ठेवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. Sachin Waze was present near Antilia while placing Scorpio Bomb

अँटिलिया प्रकरण व मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या या दोन प्रकरणांत सचिन वाझे (Sachin Waze) सध्या एनआयएच्या (NIA) कोठडीत आहे. या तपासात रोज नवी माहिती बाहेर येत आहे. आता अँटेलिया (Antilia) बंगल्याजवळ जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ कार पार्क करताना वाझे स्वतः इनोव्हा कारमध्ये घटनास्थळी उपस्थित असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) तपासात निष्पन्न झाले आहे.  

विक्रोळीपासून ठाण्यातील (Thane) साकेत सोसायटी व त्यानंतर अंबानींचा अँटेलिया बंगला (Mukesh Ambani) असा या स्काॅर्पिओचा प्रवास झाला. ही स्काॅर्पिओ तीन दिवस क्राॅफर्ड मार्केट येथील पोलिस आयुक्तालयात (Police Commissioner Office) उभी करुन ठेवण्यात आली होती, अशीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार १७  फेब्रुवारीला विक्रोळी पूर्व येथे कारची स्टेअरींग जाम झाल्यामुळे मनसुख हिरेन यांनी ती तेथेच सोडली. १७ फेब्रुवारीला विक्रोळी येथे कार सोडून मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केटला आले. १८ तारखेला वाझेने एका चालकाच्या मदतीने ती स्कॉर्पिओ कार विक्रोळीवरून ठाण्यातील आपल्या  घरी साकेत सोसायटीमध्ये आणली. 

१८ फेब्रुवारीला ती कार साकेत सोसायटीमध्ये ठेवल्यानंतर १९ फेब्रुवारीला ती कार पोलिस आयुक्तालयात आणण्यात आली. तेथे तीन दिवस ही कार ठेवण्यात आली. त्यानंतर २१ फेब्रुवारीला ही कार पोलिस आयुक्तालयातून पुन्हा साकेत सोसायटीत नेण्यात आली.त्यानंतर  रात्री ही कार तेथून निघाली व त्यानंतर ती अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याजवळ ठेवण्यात आली. या सर्व कारच्या प्रवासासाठी दोन चालकांचा वापर करण्यात आला आहे. त्यातील एक चालक पोलिस दलातील आहे, Sachin Waze was present near Antilia while placing Scorpio Bomb

तर एका खासगी चालकाचा वापर करण्यात आला. आहे. या दोनही चालकांचा जबाब एनआयएने नोंदवला आहे. ही कार अँटेलिया बंगल्याजवळील कारमायकेल रोड येथे ठेवण्यात आली. त्यावेळी वाझे स्वतः इनोव्हा कारमध्ये घटनास्थळी उपस्थित होते, असे त्यातील एका चालकाने जबाब दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख