सचिन वाझेला करायचा होता आणखी एक एन्काउंटर - Sachin Waze Was planning to do one more Encounter Say NIA | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

सचिन वाझेला करायचा होता आणखी एक एन्काउंटर

सूरज सावंत
बुधवार, 14 एप्रिल 2021

अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे याच्या घरातून एनआयएने एक पासपोर्ट जप्त केला असून संबंधित पासपोर्ट ज्याचा आहे त्या व्यक्तीचा एन्काऊंटर करुन हीच व्यक्ती अँटिलिया प्रकरणात होती, असे दाखविण्याचा वाझेचा प्रयत्न होता, असे निष्पन्न होत आहे

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे याच्या घरातून एनआयएने एक पासपोर्ट जप्त केला असून संबंधित पासपोर्ट ज्याचा आहे त्या व्यक्तीचा एन्काऊंटर करुन हीच व्यक्ती अँटिलिया प्रकरणात होती, असे दाखविण्याचा वाझेचा प्रयत्न होता, असे निष्पन्न होत आहे.Sachin Waze Was planning to do one more Encounter Say NIA

अँटिलिया स्फोटक प्रकरणात वाजेला अटक केल्यानंतर एनआयएने सचिन वाझेच्या ठाण्यातील घराची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी सचिन वाझे यांच्या घरातून एक पासपोर्ट जप्त केला होता. त्याचबरोबर काही जिवंत काडतुसही सापडली होती. या मागची कारणं शोधताना  वाझेला या घटनेनंतर पुन्हा काही तरी मोठं करायचं होतं, असं दिसून आलं आहे. वाझेच्या या कटामागील हेतूंचा शोध घेताना, वाझेला या पासपोर्टवाल्या व्यक्तीचा एन्काऊटर करून त्याचा या गुन्ह्यात हात असल्याचं भासवायचं होतं, असे सूत्रांकडून समजलं आहे.

बनावट नंबर प्लेट, चोरीच्या गाड्या वापरून वाझेने अँन्टीलियाचा कट रचला खरा, माञ पोलीसांच्या तिसऱ्या डोळ्यापासून वाझे वाचू शकला नाही. या प्रकरणात वाजेला एनआयएनं अटक केल्यानंतर त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली होती. त्यावेळी घरात आणि त्यांच्या गाडीमध्ये या गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे येणे जप्त केले होते. या संपूर्ण पुराव्यांमध्ये जिवंत काडतूस आणि वाजेच्या घरातला सापडलेला पासपोर्ट याची कुठेही लिंक लागत नव्हती. अशातच पुरावे नष्ट केल्याचा हेतूने मिठी नदी केलेल्या शोध मोहिमेत औरंगाबादची नंबर प्लेट असलेली पाटी सापडली. आणि वाझेच्या अडचणी आणखी वाढल्या. Sachin Waze Was planning to do one more Encounter Say NIA

मिठी नदीतील सापडलेली बनावट नंबर प्लेट आणि वाजेच्या घरात सापडलेली ६२ जिवंत काढतूसं व पासपोर्ट.याचा कुठेतरी एकमेकांशी संबंध येत असल्याने त्या दृष्टिकोनातून तपासाला सुरुवात केली. त्यावेळी संबधित नंबरप्लेट ही औरंगाबादमधील एका व्यक्तीच्या गाडीची असल्याचं समोर आलं, त्याची गाडी नोव्हेंबर 2020 मध़्य चोरीला गेली होती.

याच गाडीत वाझे पासपोर्ट वरील व्यक्तीचा आणि अन्य एकाचा घरातून सापडलेल्या जिवंत काडतुसाच्या मदतीने एन्काऊटर करणार होता आणि हा गुन्हा निकाली काढून प्रसिद्धी झोतात येणार होता, असं सूञांकडून सांगितलं जात आहे. मात्र नशिबाने सचिन वाझेला साथ दिली नाही. Sachin Waze Was planning to do one more Encounter Say NIA

या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझेसह त्याचा सहकारी रियाज काझी यालाही एनआयएने बेड्या ठोकल्या, रियाज काझीने या  संपूर्ण गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांने मिठी नदीत टाकलेले पुरावे एनआयएने शोधून काढले आणि वाझेच्या भोवती फास आवळला.

Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख