'त्या' बाईकवरुन वाझेने केला होता काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास - Sachin Waze Travelled Kashmir to Kanyakumari on Sports Bike Say NIA | Politics Marathi News - Sarkarnama

'त्या' बाईकवरुन वाझेने केला होता काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास

सूरज सावंत
मंगळवार, 6 एप्रिल 2021

अँटिलिया बाँब प्रकरण (Antilia Bomb Case) आणि मनसुख हिरेन  हत्या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेल्या निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझेशी (Sachin Waze) संबंधित स्पोर्टस् बाईक एनआयएने जप्त केली आहे. ही बाईक सध्या अटकेत असलेला सचिन वाझेही चालवत होता

मुंबई  : अँटिलिया बाँब प्रकरण (Antilia Bomb Case) आणि मनसुख हिरेन  हत्या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेल्या निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझेशी (Sachin Waze) संबंधित स्पोर्टस् बाईक एनआयएने जप्त केली आहे. ही बाईक सध्या अटकेत असलेला सचिन वाझेही चालवत होता. त्याने या बाईकवरुन कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास केला होता, असे तपासात दिसून आले आहे. Sachin Waze Travelled Kashmir to Kanyakumari on Sports Bike Say NIA

काल एनआयएने दमणहून (Daman) ही बाईक जप्त केली. याच बाईकवरुन वाझेने लॉंग ड्राईव्ह केले होते. सचिन वाझे एका व्हिडिओत एका बाईक रायडर टीम सोबत हे बेनली स्पोर्ट्स चालवताना दिसून आला आहे. हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वी युट्युबवर पोस्ट करण्यात आलाय.त्यावेळी वाझेने कन्याकुमारी (Kanyakumari) ते काश्मिर (Kashmir) असा या बाईकने त्यांच्या मित्रांसोबत प्रवास केला होता. 

दरम्यान, अँटिलिया बाँब प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. एनआयएने वाझेशी संबंधित एका सोशल क्लबवर टाकलेल्या छाप्यात एक डायरी हाती लागली आहे. या डायरीमध्ये पोलिसांना (Police) दिल्या जाणाऱ्या हप्त्यांच्या नोंदी असल्याची सूत्रांची माहिती आहे. या डायरीमुळे पोलिसांचे आर्थिक हितसंबंध उघड होत आहेत. Sachin Waze Travelled Kashmir to Kanyakumari on Sports Bike Say NIA

वाझेचे वर्सोवा येथील एका बँकेत सामाईक खाते असल्याचेही एनआयएला दिसून आले आहे. वाझेला अटक झाल्यानंतर या खात्यातून २६ लाख रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले आहे. लाॅकरमधून काही महत्त्वाची कागदपत्रेही एनआयएने हस्तगत केली आहे. याच डायरीचा हवाला एनआयएने न्यायालयातही दिला होता. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख