क्लोरोफाॅर्मने बेशुद्ध करुन मनसुख हिरेन यांची हत्या? - Sachin Waze Made Mansukh Hiren Unconscious By using Chloroform | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

क्लोरोफाॅर्मने बेशुद्ध करुन मनसुख हिरेन यांची हत्या?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मार्च 2021

४ मार्च रोजी हिरेन यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह खाडीत मिळाला. त्यावेळी त्यांच्या तोंडावर मास्क होता व आतमध्ये तोंडावर रुमाल बांधलेले होते. हे रुमाल वापरुनच हिरेन यांना बेशुद्ध करण्यात आले असावे, असा एनआयएचा संशय आहे.

मुंबई : अँटिलिया बाँब प्रकरणात ज्या व्यक्तीच्या गाडीचा वापर झाला त्या मनसुख हिरेन यांना ठार मारण्यासाठी क्लोरोफाॅर्मचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. (Sachin Waze Made Mansukh Hiren Unconscious By using Chloroform)

हिरेन यांना गाडीतच क्लोरोफाॅर्म वापरुन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तोंडात रुमाल कोंबून खाडीत फेकण्यात आले, अशी माहिती एनआयएला (NIA) सचिन वाझे व अन्य संशयितांच्या तपासात मिळाली आहे. ज्यावेळी मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांची हत्या झाली तेव्हा संशयित आरोपी विनायक शिंदेही तिथे होता, असेही एनआयएला समजले आहे.

४ मार्च रोजी हिरेन यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह खाडीत मिळाला. त्यावेळी त्यांच्या तोंडावर मास्क होता व आतमध्ये तोंडावर रुमाल बांधलेले होते. हे रुमाल वापरुनच हिरेन यांना बेशुद्ध करण्यात आले असावे, असा एनआयएचा संशय आहे. दरम्यान, घटनास्थळी वाझे (Sachin Waze) उपस्थित होते अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एटीएस (ATS)च्या रिमांडमध्ये ही माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. मनसुख यांची हत्या करून त्यांच्या तोंडावर रुमाल ठेवून नंतर स्कार्फ सारखा मास्क लावण्यात आला आणि मृतदेह खाडीत फेकला गेला अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

हे देखिल वाचा - अंबानींना धमकीचे पत्र सचिन वाझेनेच लिहिले

मनसुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मोबाईलमधले सिमकार्ड वेगवेगळ्या मोबाईलमध्ये टाकण्यात आले. काही वेळासाठी वसईमधल्या मांडवी गावात काही वेळासाठी मोबाईल सुरू करण्यात आला आणि पुन्हा बंद केला गेला. असेही सांगितले जात आहे. (Sachin Waze Made Mansukh Hiren Unconscious By using Chloroform)

हे  सगळे झाल्यानंतर वाझे पुन्हा ठाण्यातून मुंबईच्या दिशेने निघाले आणि रात्रीच्या सुमारास डोंगरी परिसरात रेड सुरू होती असे भासवून त्यांनी डोंगरी पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये नोंद केली, असेही तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख