अंबानींना धमकी देणारे 'ते' पत्र सचिन वाझेनेच लिहिले! - Sachin Waze Drafted Threat letter to Mukesh Ambani Claims NIA | Politics Marathi News - Sarkarnama

अंबानींना धमकी देणारे 'ते' पत्र सचिन वाझेनेच लिहिले!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मार्च 2021

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके भरलेल्या स्काॅर्पिओमध्ये सापडलेले धमकीचे पत्र वाझेंनीच लिहिले होते, अशी कबूली त्यांनी एनआयए (NIA)ला दिल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी खळबळजनक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात सचिन वाझे एनआयएच्या कस्टडीत आहेत.

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके भरलेल्या स्काॅर्पिओमध्ये सापडलेले धमकीचे पत्र वाझेंनीच लिहिले होते, अशी कबूली त्यांनी एनआयए (NIA)ला दिल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी खळबळजनक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात सचिन वाझे एनआयएच्या कस्टडीत आहेत. अन्य दोन संशयितांनाही काल एटीएस (ATS)ने एनआयएच्या ताब्यात दिले आहे. (Sachin Waze Drafted Threat letter to Mukesh Ambani Claims NIA)

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवावा असे आदेश काल ठाण्याच्या विशेष न्यायालयाने दिले. त्यानंतर या प्रकरणातली कागदपत्रे व संशयित आरोपी यांचा ताबा एटीएसने एनआयए कडे दिला. दरम्यान, धमकीचे ते पत्र सचिन वाझे (Sachin Waze) यानेच लिहिले होते व या प्रकरणात अटक करण्यात आलेला बडतर्फ काँन्स्टेबल विनायक शिंदे याच्या घरातील प्रिंटरवर त्याची प्रिंट काढली, अशी माहिती एनआयएला वाझेने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, हिरेन यांच्या हत्येच्या दिवशी म्हणजेच ४ मार्चला  वाझे संपूर्ण दिवस त्यांच्या कार्यालयात होते असे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांचे लोकेशन तपासले असता वाझे दुपारी चेंबूर MIDC मध्ये होते असे दिसून आले आहे. वाझे त्या दिवशी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी चेंबूरमध्ये नेमकं कोणाला भेटायला आले होते, याचा आता शोध सुरू आहे.

 ज्या रात्री मनसुख बेपत्ता झाले. त्यावेळी तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन येईल याची पूर्व कल्पनाही वाझे यांनी मनसुखला दिली होती.वाझे या प्रकरणात मनसुखला अटक होण्यास सांगून जामीनावर बाहेर काढण्याचे आश्वासन देत होते. मात्र मनसुखच्या पत्नीला हे मान्य नव्हतं. म्हणूनच वाझेंनी मनसुखला त्याच्या पत्नीला घराबाहेर पडताना क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलवलं असल्याचं सांगण्यास सांगितलं असल्याचे ATS च्या तपासात समोर आले आहे. (Sachin Waze Drafted Threat letter to Mukesh Ambani Claims NIA)

मनसुख ज्यावेळी वाझेंना भेटायला गेला, त्यावेळी गाडीत बसवून वाझे त्याच्या आॅडी कारने मुंबईत बारवर रेड करायला निघाले आणि त्यांची कार मुलुंड टोल नाक्यावरील CCTV ही कैद झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गाडीचा एनआयए आणि एटीएस मागील अनेक दिवसापासून शोध घेत आहेत.

मुंबईत आल्यानंतर प्रथम वाझे यांनी आपला मोबाइल जाणून बुजून आपल्या केबिनमध़्ये चार्जिंगला लावून ठेवला आणि ते कारवाईसाठी निघून गेले. कारण मोबाोइलचं लोकेशन काढलं गेलं तर वाजे त्या राञी पोलिस मुख्यालयात होता असे दिसले असते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख