सचिन वाझे प्रकरण - पोलिसांच्या हप्त्यांच्या नोंदींची डायरी सापडली - Sachin Waze Diary reveled Bribes give to Police officers | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझे प्रकरण - पोलिसांच्या हप्त्यांच्या नोंदींची डायरी सापडली

सूरज सावंत
सोमवार, 5 एप्रिल 2021

अँटिलिया बाँब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. एनआयएने वाझेशी संबंधित एका सोशल क्लबवर टाकलेल्या छाप्यात एक डायरी हाती लागली आहे

मुंबई : अँटिलिया बाँब प्रकरण (Antilia Bomb Case) आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. एनआयएने वाझेशी (Sachin Waze) संबंधित एका सोशल क्लबवर टाकलेल्या छाप्यात एक डायरी हाती लागली आहे. Sachin Waze Diary reveled Bribes give to Police officers

या डायरीमध्ये पोलिसांना दिल्या जाणाऱ्या हप्त्यांच्या नोंदी असल्याची सूत्रांची माहिती आहे. या डायरीमुळे पोलिसांचे आर्थिक हितसंबंध उघड होत आहेत. वाझेचे (Sachin Waze) वर्सोवा येथील एका बँकेत सामाईक खाते असल्याचेही एनआयएला (NIA) दिसून आले आहे. वाझेला अटक झाल्यानंतर या खात्यातून २६ लाख रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले आहे. लाॅकरमधून काही महत्त्वाची कागदपत्रेही एनआयएने हस्तगत केली आहे. याच डायरीचा हवाला एनआयएने न्यायालयातही दिला होता. 

दक्षिण मुंबईतील गिरगाव (Girgaum) येथे एका क्लबमध्ये वाझे नियमित जात होता. याच क्लबमधून ही डायरी व कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. या कागदपत्रांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची नांवे व त्यांच्या पुढे रक्कम लिहिण्यात आली आहे. या नोंदी हप्त्यांच्या असाव्यात असा एनआयएला संशय आहे. या नोंदी महिनानिहाय आहेत. एनआयए ही कागदपत्रे प्राप्तिकर खाते (Income Tax) किंवा सीबीआयकडे (CBI) सोपविण्याच्या विचारात आहे. Sachin Waze Diary reveled Bribes give to Police officers

दरम्यान, वाझेची एक स्पोर्टस बाईकही जप्त करण्यात आली आहे. ही दुचाकी दमणहून एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आली आहे. वाझेची व्होल्वो कार ज्या कारखान्यातून जप्त करण्यात आली, त्याचा कारखान्याच्या पार्टनरकडे ही बाईक असल्याते सांगण्यात येत आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख