आठवलेंची सुरक्षा पूर्ववत करा अन्यथा..... - RPI Demans Restoration of Ramadas Athavale Security | Politics Marathi News - Sarkarnama

आठवलेंची सुरक्षा पूर्ववत करा अन्यथा.....

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

बहुजनांचे नेते केंद्रिय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची सुरक्षा दोन दिवसांत पूर्ववत करण्यात आली नाहीतर येत्या दि.१७ जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा येथील मातोश्री निवासस्थानी रिपाइं तर्फे निषेध आंदोलन करण्यात येईल असा ईशारा बहुजन विद्यार्थी पतिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिला. 

मुंबई : बहुजनांचे नेते केंद्रिय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची सुरक्षा दोन दिवसांत पूर्ववत करण्यात आली नाहीतर येत्या दि.१७ जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा येथील मातोश्री निवासस्थानी रिपाइं तर्फे निषेध आंदोलन करण्यात येईल असा ईशारा बहुजन विद्यार्थी पतिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिला. 

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे राज्य सरकार विरोधात मुंबईत आझाद मैदान या  ठिकाणी  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदे चे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आणि मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला.

दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा राज्य सरकार चा निर्णय हा राजकीय द्वेष भावनेतून आणि कोत्या मनोवृत्तीतून घेण्यात आलेला चुकीचा निर्णय आहे. त्याबाबत फेरविचार करण्याचे राज्य सरकार ला निर्देश द्यावेत या मागणीसाठी लवकरच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वात रिपाइं चे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे रिपाइं तर्फे अधिकृत कळविण्यात आले आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख