हे काय नविन? आता म्हणे उंच व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक! - Research revels Tall Persons are more prone to Corona | Politics Marathi News - Sarkarnama

हे काय नविन? आता म्हणे उंच व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

हवेतून कोरोनाचा प्रसार होण्याची माहिती याआधीही समोर आली होती. मात्र, यावेळी हजारो लोकांचा अभ्यास करण्यात आल्याने हे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आता बाहेर वावरताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

मुंबई  : कोरोना विषाणू केवळ बाधिताच्या तोंडातून बाहेर पडलेल्या बिंदूमधून पसरत नाही, तर हवेतूनही पसरतो. त्यामुळे सहा फूट उंच व्यक्तींना कोरोनाची बाधा अधिक होत असल्याचे समोर आले आहे. मॅंचेस्टर ओपन युनिव्हर्सिटी अंतर्गत जगभरातील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये अमेरिकेसह इतर देशांतील दोन हजारांहून अधिक व्यक्तींचा संशोधकांनी अभ्यास केला.

हवेतून कोरोनाचा प्रसार होण्याची माहिती याआधीही समोर आली होती. मात्र, यावेळी हजारो लोकांचा अभ्यास करण्यात आल्याने हे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आता बाहेर वावरताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

एखाद्या बाधित व्यक्तीच्या तोंडातून निघालेले विषाणू हवेत पसरतात. मात्र, हे विषाणू बराच वेळ ६ फूट अंतरावर हवेत तरंगत असल्याने त्यातून दुसऱ्या उंच व्यक्तीला बाधा पोहोचते. केवळ तोंडातून निघालेल्या थुंकीतून विषाणू पसरले असते तर हा धोका फार उद्भवला नसता, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. उंचीशिवाय लोकांचे दैनंदिन व्यवहार, त्यांची कामाची, जगण्याची पद्धत यानुसार कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी-अधिक असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती डॉ. भोंडवे यांनी दिली.

मास्क घालणे आवश्‍यक
बाधिताच्या तोंडातून लिघालेल्या बिंदूमुळे हवेतून हे विषाणू पसरत असल्याने सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे संशोधक सांगतात. याशिवाय आजूबाजुचा परिसर स्वच्छ करणेही महत्त्वाचे असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणे, शौचालये, स्वयंपाकघरांतून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका 3.5 टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख