बेस्ट समिती अध्यक्षपद निवडणूक; विरोधी पक्षनेतेच मैदानात - Ravi Raja filed nomination for BEST Chairman Post in Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

बेस्ट समिती अध्यक्षपद निवडणूक; विरोधी पक्षनेतेच मैदानात

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

भाजपने आता अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले असले, तरी ही निवडणूक आवाजी पद्धतीने होते. त्यात भाजपने जर कॉंग्रेसच्या उमेदवाराला मत दिले, तर शिवसेनेवर नामुष्की ओढावू शकते. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. त्यातच भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी आता इमोशन खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे

मुंबई  : बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा मैदानात उतरले आहेत. रवी राजा यांनी गुरुवारी (ता. १) कॉंग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महापालिकेच्या सुधार समितीसह बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी ६ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. रवी राजा यांनी कॉंग्रेसकडून बेस्ट समितीसाठी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेकडून प्रवीण शिंदे आणि भाजपकडून प्रकाश गंगाधरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सदानंद परब, भाजपकडून विनोद मिश्रा आणि कॉंग्रेसकडून जावेद जुनेजा यांनी अर्ज दाखल केला आहे.

कॉंग्रेसची कोंडी
भाजपने आता अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले असले, तरी ही निवडणूक आवाजी पद्धतीने होते. त्यात भाजपने जर कॉंग्रेसच्या उमेदवाराला मत दिले, तर शिवसेनेवर नामुष्की ओढावू शकते. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. त्यातच भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी आता इमोशन खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे. वैधानिक समितीत अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्याची संभावना आणि हालचाली लक्षात घेता कॉंग्रेस हा खरोखरीचा विरोध पक्ष आहे की शिवसेना पुरस्कृत विरोधी पक्ष आहे? अशी शंका आहे. कॉंग्रेसने वैधानिक समिती अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेतल्यास विरोधी पक्षनेतेपदाचा तकलादू दावा उघड होईल. भाजपला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल, असे सांगत शिरसाट यांनी कॉंग्रेसची कोंडी केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


संख्याबळ
पक्ष बेस्ट समिती सुधार समिती
शिवसेना १२
भाजप १०
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
समाजवादी पार्टी