Rape started in quarantine center, what is Maharashtra government doing? Question of Ram Kadam | Sarkarnama

क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार होऊ लागले, महाराष्ट्र सरकार काय करतेय ? राम कदमांचा सवाल 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 जुलै 2020

या अत्याचारीत महिलेने केलेल्या तक्रारीनंतर आरोपीाला तातडीने अटक करण्यात आल्याची माहिती पनवेल एसीपी रवींद्र गिते यांनी दिली आहे. 

रायगड : क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर आता अत्याचार होऊ लागले आहेत. पनवेल येथील घटना धक्कादायक आहे. महाराष्ट्र सरकार काय करीत आहे ? असा संतप्त सवाल भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी केला आहे. 

एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यांच्यावर उपचार करताना आरोग्य विभागाच्या नाकेनऊ येत आहेत. सरकार कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहे. हे सर्व एकीकडे सुरू असताना रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये एका चाळीस वर्षीय महिलेवरच अत्याचार करण्यात आला आहे.

या अत्याचारीत महिलेने केलेल्या तक्रारीनंतर आरोपीाला तातडीने अटक करण्यात आल्याची माहिती पनवेल एसीपी रवींद्र गिते यांनी दिली आहे. 
मात्र या घटनेने खळबळ माजली आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये जर महिला सुरक्षित नसतील तर कोरोनाग्रस्त रुग्ण महिलांनी काय घरीच बसावे का ? असा सवालही केला जात आहे. 

गीते यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले, की पनवेल येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये काही संशयीत कोरोना रुग्णांना भरती करण्यात आले आहे. येथे किमान चारशे रुग्ण आहेत. ज्या महिलेवर अत्याचार झाले ती महिला या सेंटरमध्ये होती. या महिलेवर अत्याचार झाल्याची तक्रार येताच आम्ही तातडीने घटनास्थळी रवाना झालो आणि आरोपीला अटकही केली आहे. 

या घटनेची माहिती मिळताच आमदार राम कदम यांनी थेट ठाकरे सरकारवरच हल्ला चढविला आहे. त्यांनी म्हटले आहे, की सर्वत्र गैरप्रकार आणि गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्र सरकार काय करीत आहे.क्वारंटाईन सेंटर्समध्ये गैरव्यवस्थापन आणि गैरप्रकार सुरू आहेत असा आरोपही कदम यांनी केला आहे.  

 45 टक्के पॉझिटिव्ह मुंबईकर होमक्वारंटाईन

मुंबई : कोरोना बाधित 10,366 मुंबईकर होम क्वारंटाईन असून त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. तर 9,771 रुग्ण हे विविध रुग्णांलयात उपचार घेत आहेत. सौम्य लक्षणे असलेले 2,691 रुग्णांना जम्बो कोव्हिड फॅसिलिटी सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईत 22,828 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून त्यातील 45 टक्के लोकांनी घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अंधेरीतील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दांम्पत्याने सांगितले की, आम्ही रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेणे पसंत केले. रुग्णालयांतील वातावरणाबाबत साशंकता असून मनात थोडी भीती होती. शिवाय आम्हा दोघांना ही वेगवेगळे राहायचे नसल्याने आम्ही होम क्वारंटाईन होण्याचे ठरवले. अशा प्रकारे अधिकतर रुग्ण होम क्वारंटाईन असल्याचे समोर आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख