उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय... - Raj Thackeray Sarcastic Comment on CM Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

राज्यात लावलेल्या मिनी लाॅकडाऊन वरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारच्या त्रुटी दाखवून देत सरकारला चिमटेही काढले. अँटिलिया बाँब प्रकरण, मंत्र्यांचे राजीनामे, कोरोनाची स्थिती हाताळण्याची पद्धत याबद्दल भाष्य केले

मुंबई : राज्यात लावलेल्या मिनी लाॅकडाऊन वरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्य सरकारच्या त्रुटी दाखवून देत सरकारला चिमटेही काढले. अँटिलिया बाँब प्रकरण, मंत्र्यांचे राजीनामे, कोरोनाची स्थिती हाताळण्याची पद्धत याबद्दल भाष्य करतानाच राज यांनी 'उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हाती राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय...हे समजत नाही,' असा चिमटा काढला. Raj Thackeray Sarcastic Comment on CM Uddhav Thackeray

काल मी मुख्यमंत्र्याना कॉल केला होता. लोकडाऊन (Lock Down) बाबत भेटीची विनंती केली होती. पण त्यांच्या आजूबाजूला खूप लोक पॉझिटिव्ह आहेत. म्हणून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. काल आमचे झूम वर काय बोलणे झाले ते सांगत आहे, असे म्हणत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. लाॅकडाऊन बाबत बोलताना ते म्हणाले, "लोकडाऊन झाला तेव्हा तो बऱ्यापैकी पाळला गेला, पुन्हा सर्वजण लोकडाऊन पाळतील. पेशंट ची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र (Maharashtra) औद्योगिक राज्य आहे त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची संख्या खूप आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election) निवडणूक आहे.  बाहेर कोरोना नाही का हा प्रश्न आहे. बाहेरून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लोक येतात. बाहेर राज्यात आकडे मोजले जात नाहीत. तिथे न मोजल्यामुळे आकडे कळत नाहीत,"

राज्यात बदल्यांचे बाजार होतात असा आरोप करुन ते म्हणाले, "४० दिवसात २ राजीनामे बघायला मिळतात. पण ते मंत्री देखील असे वागत आहेत ना म्हणून असे हे राजीनामे बघायला मिळत आहेत. सरकार म्हणजे इमारत नाही खालचे पिलर काढले की कोसळायला. असे कधी सरकार कोसळत नाही. अनिल देशमुख (Anil Deshmukh) हा महत्त्वाचा विषय नाही. अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराच्या खाली गाडी कुणी ठेवली हा विषय आहे. पोलिसांनी (Police) कुणाच्या तरी सांगण्यावरुन ही गाडी ठेवली. कुणीतरी सांगितल्याशिवाय पोलिस असं करणार नाहीत," सुशांत केसमध्ये त्याने आत्महत्या केली आणि जेलमध्ये गेला अर्णब. उद्धव ठाकरे यांच्या हाती राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय, असा खोचक सवालही त्यांनी केला. Raj Thackeray Sarcastic Comment on CM Uddhav Thackeray
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख