आजचा वाढदिवस- राज ठाकरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

राज (स्वरराज) श्रीकांत ठाकरे :जन्म - १४ जून १९६८महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस.राज हे उत्तम वक्ते आहेत. आपली मते ते स्पष्टपणे मांडतात. त्यांच्या सगळ्याच सभा प्रचंड गर्दी खेचणाऱ्या असतात. ते स्वतः साहित्य, कला, संगीत यांचे उत्तम जाणकार आहेत.
Raj Thackeray Birthday
Raj Thackeray Birthday

राज ठाकरे यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू होते. प्रसिद्ध संगीतकार म्हणून श्रीकांत ठाकरे सर्वांच्या परिचयाचे होते. राज ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण दादर मधील बालमोहन विद्यालयात पूर्ण झाले. त्यांचे संपूर्ण बालपण दादर येथेच गेले. राज ठाकरे हे स्वतः उत्तम व्यंग्यचित्रकार आहेत. "जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचाय" असे ध्येय ते बाळगून आहेत.  राज हे उत्तम वक्ते आहेत. आपली मते ते स्पष्टपणे मांडतात. त्यांच्या सगळ्याच सभा प्रचंड गर्दी खेचणाऱ्या असतात. ते स्वतः साहित्य, कला, संगीत यांचे उत्तम जाणकार आहेत. 

लहानपणापासून शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहून त्यांना राजकारणाचा बाळकडू मिळाले. आपली राजकीय कारकिर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना अशा जबाबदाऱ्या त्यांनी शिवसेनेत मोठ्या आक्रमकपणे सांभाळल्या. याच काळात शिव उद्योग सेनेसाठी मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम त्यांनी मुंबईत आयोजित केला होता. तो गाजला आणि त्यावर टिकाही झाली होती. मुंबईतील एक जागा सोडण्याच्या वादात रमेश किणी यांचा खून झाला. त्या प्रकरणात राज यांचे नाव गोवले गेले. पण त्यातून ते सुटले.

पुढे शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे सांगत जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना सोडली व ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर मराठीचा मुद्दा उचलून धरला. त्यांनी मुंबईत व राज्यात येणाऱ्या परप्रांतिय व विशेषतः बिहार व उत्तर प्रदेशच्या लोकांना टिकेचे लक्ष्य केले. त्यामुळे राज व त्यांची मनसे यावर कायमच टिका होत राहिली. 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लक्षणीय यश मिळाले. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथील एकूण १३ आमदार निवडून आले. नंतर नाशिक महापालिकेवरही सत्ता आणण्यात राज ठाकरे यांना यश मिळाले. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणीही मनसेचे अनेक नगरसेवक निवडून आले. नंतरच्या निवडणुकांत मात्र मनसे फारसा प्रभाव दाखवू शकली नाही. 

२०१९ च्या निवडणुकांत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांच्या धोरणांवर आपल्या सभांमधून खुली टिका केली. त्याचा फायदा शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला मिळाला, असेही बोलले जाते. मध्यंतरीच्या काळात कोहिनूर मिल प्रकरणावरून राज यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, राज धैर्याने 'ईडी'च्या चौकशीला सामोरे गेले. 

अशा या बेधडक नेत्याचा आज वाढदिवस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणाला शुभेच्छा द्यायला कुणी येऊ नये असे आवाहन राज यांनी केले आहे. मनसैनिकांनी असाल तिथेच थांबून लोकांना मदत करावी, याच आपल्यासाठी शुभेच्छा आहेत, असे राज यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com