Pravin Darekar- Anil Deshmukh
Pravin Darekar- Anil Deshmukh

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रवीण दरेकरांची मागणी

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. औरंगाबाद येथील कोविड सेंटरमध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.

मुंबई : राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. औरंगाबाद येथील कोविड सेंटरमध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. 

औरंगाबादमध्ये कोविड सेंटरमध्ये एका डाॅक्टरने एका युवतीकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. ''औरंगाबादच्या कोव्हीड सेंटर मध्ये युवतीला डाॅक्टराने शरीरसुखाची मागणी केली.आठ दिवसानंतर मुलीने जेव्हा डाॅक्टरांना सांगितल की मला बरं वाटत आहे. त्यानंतर डाॅक्टरांनी तिच्याकडे मागणी केली.- या डाॅक्टरवर ताबडतोब कारवाई केली पाहीजे आणि निलंबित केल पाहीजे,'' असे दरेकर म्हणाले. 

संभाजीनगर मध्ये एका महिलेचा डॉकटरने विनयभंग केला. त्या डॉकटर ला निलंबित सरकारने करावे. व इतर जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे. जर कारवाही होणार नसेल तर तीव्र आंदोलन केल जाईल, असा ईशारा विधानसभेत भाजप आमदार अतुल सावे यांनी दिला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. ''त्या महिलेवर बलात्कार झाला नाही. त्या डॉकटरला निलंबित केलं आहे. ती महिला तक्रार करायला तयार नाहीत. त्या डॉकटरने चूक केली आहे. विनयभंग केला आहे. त्या महिलेचा नवरा आणि डॉकटर मित्र आहेत. त्या महिलेचं नाव कुठे ही न येता डॉक्टर वरती करवाई केली जाईल," असे पवार यांनी सांगितले.
Edited By- Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com