मुंबई : टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर काल माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ही मागणी रास्त असून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.
''एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशी चा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे.. सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही,''असे म्हणत काल पंकजा यांनी सरकारवर निशाणा साधला होता.
याबाबत दरेकर म्हणाले, "आम्ही संजय राठोड यांना राजीनामा देण्यासाठी दबाव वाढवला. पंकजा मुंडे यांची मागणी रास्त आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहीजे,'' दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. मग, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंबाबत वेगळी भूमिका का? या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ''धनंजय मुंडे यांच्याबाबत करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही,'' असे विधान केले होते.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.