एकट्यालाच बोलता येतं हे राऊतांनी समजू नये : प्रवीण दरेकरांची टीका

राज्यातील सरकार पाडून दाखवा... पाडून दाखवा... असे सत्ताधारी नेते म्हणत आहे. कारण त्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे. म्हणजे त्यांनाच स्वत:ला सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटत असावी, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली.
Pravin Darekar - Sanjay Raut
Pravin Darekar - Sanjay Raut

मुंबई : राज्यातील सरकार पाडून दाखवा... पाडून दाखवा... असे सत्ताधारी नेते म्हणत आहे. कारण त्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे. म्हणजे त्यांनाच स्वत:ला सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटत असावी, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. 

सरकार पाडतो, असे कोणीही म्हणत नाही, ऑपरेशन लोटस हा शब्दही कोणी उच्चारत नाही. तरीही ऑपरेशन लोटसमुळे आम्हांला खरचटलेही नाही, असे सत्ताधारी सांगतात. भाजपने खरंच काही करायचे ठरवले तर खरचटणे सोडाच, पण रक्तबंबाळ व्हाल, असा इशाराही त्यांनी दिला. थडगी उकरून काढण्याची भाषा शिवसेना नेते संजय राऊत करीत आहे, पण बोलायला केवळ त्यांनाच येते, असे त्यांनी समजू नये. सगळ्यांना बोलायला येते, मग थडगी काय आणि दुसरे काय, सर्वांचाच पर्दाफाश करता येईल. त्यामुळे कोणी आव्हान देण्याची भाषा करु नये, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. 

सरकारने एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचे नेते स्वतःची पाठ थोटपून घेत आहेत, मात्र वर्षभरात सरकारने भरीव असे काहीच केले नाही. सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही, शेतकरी अतिवृष्टीने हैराण आहे. कोकणात निसर्गग्रस्तांना मदत नाही, कामगार बेजार आहे, बेरोजगारी मिटविण्यासाठी कंपन्यांशी करार करतात, मात्र प्रत्यक्षात काही होत नाही. आजही कोविड नियंत्रणात आणू शकत नाही. मग वर्ष पूर्ण केल्याच्या गमजा मारण्याला काय अर्थ आहे? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला निर्णय म्हणजे सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. 

महाराष्ट्रातील लाखो वारकरी, हिंदुत्वप्रेमी जनता, मंदिरावर उपजिविका अवलंबून असणा-यांची ही मागणी होती. त्यांचा रेटा व दबाव सरकारवर होता, त्यामुळेच उशिरा को होईना सरकारला निर्णय घ्यावा लागला. त्याचे स्वागत आहे पण हा निर्णय अगोदरच व्हायला हवा होता. मंडई, मॉल्स, रेस्टॉरन्टस, बार, जीम्स, व अन्य सार्वजनिक स्थळे खुली केली होती. वारकरी सांप्रदायाने अतिशय जिव्हाळ्याने मंदिरे उघडण्याची भूमिका मांडली होती, त्यामुळे सरकारने आधीच हा निर्णय घेणे अपेक्षित होते. पण केवळ अहंकार व प्रतिष्ठेमुळे सरकारने हा निर्णय घेतला नाही. कोरोनाचे संकट असताना मंदिरे उघडल्यामुळे जनतेला दिलासा मिळेल, त्यामुळे जनेतेने सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com