प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोळेंना ईडीकडून अटक - Pratap Sarnaik Associate Arrested by ED | Politics Marathi News - Sarkarnama

प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोळेंना ईडीकडून अटक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ होत असून सक्तवसुली संचनालयाने (ईडी) सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना अटक केली आहे. चांदोळे यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून नंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ होत असून सक्तवसुली संचनालयाने (ईडी) सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना अटक केली आहे. चांदोळे यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून नंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, सरनाईक यांचे पूत्र विहंग यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

प्रताप सरनाईक हे काल ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणे अपेक्षित होते. मात्र, तिथे न जाता ते क्वारंटाईन झाले आहेत. क्वारंटाईनचा कालावाधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावले जाणार आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अमित चंदोले हे विहंग यांच्या वतीने रोख व्यवहार करत होते. त्यांच्याकडे ईडी याबाबत चौकशी करणार आहे. चांदोले यांनी लंडनमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेबाबतही त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. विहंग आणि चांदोले यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे.

शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) छापा मंगळवारी छापा टाकला होता. त्यांच्या कार्यालयाचीही तपासणी करण्यात आली होती.  टाकला आहे. त्यांच्या कार्यालयावरही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. प्रताप सरनाईक यांचे घर माजीवाडा मधील दोस्ती मध्ये आहे आणि ऑफिस वर्तक नगरला पाम क्लबच्या बाजूच्या इमारती मध्ये आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने सरनाईक व त्यांच्या मुलांची चौकशी सुरु केली आहे. 

सरनाईक यांना चौकशीसाठी काल हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले होते. मात्र, सरनाईक हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. आमदार सरनाईक यांचे मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालये आणि घरावर ईडीने काल छापा टाकत कारवाई केली होती. दहा ठिकाणी छापा टाकून कारवाई केल्यानंतर सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोचले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांची चौकशी सुरू केली होती. 

ईडीने सरनाईक यांचे पुत्र विहंग यांची दोन दिवसांपूर्वी पाच तास कसून चौकशी केली आहे. चौकशी झाल्यानंतर ते ठाण्याला रवाना झाले होते. विहंग यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने विहंग सरनाईक यांची काल ५ तास चौकशी केली. त्यांच्याकडून १० कंपन्यांसंदर्भातील प्राथमिक माहिती घेण्यात आली आहे. त्यांच्याशी संबंधित कंपन्यांचे सगळे व्यवहार तपासले जाणार आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख