21 दिवसांत साडेपाच हजार कोटी चुकते करा, अनिल अंबानी यांना निर्देश

या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र न्यायालयाच्या या आदेशात बदल होण्याची शक्‍यता कमी असल्याचे कायदेतज्ज्ञांनी म्हटले आहे.
21 दिवसांत साडेपाच हजार कोटी चुकते करा, अनिल अंबानी यांना निर्देश

मुंबई  : आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या रिलायन्स उद्योगसमूहाचे संचालक अनिल अंबानी यांच्यापुढे एक नवीन आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

21 दिवसांमध्ये त्यांना तीन चिनी बॅंकांचे साडेपाच हजार कोटी रुपये चुकते करावे लागणार आहेत. इंग्लंडच्या एका न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

2012 मध्ये अनिल अंबानी यांनी तीन चिनी बॅंकांकडून कर्ज घेतले होते. या कर्जासाठी अनिल अंबानी यांनी व्यक्तिगत हमी दिली होती. त्यामुळे त्यांना हे पैसे चुकवणे बंधनकारक आहे, असे न्यायाधीशांनी निर्णय देताना म्हटले आहे.

2012 मध्ये रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बॅंक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बॅंक आणि एक्‍जिम बॅंक ऑफ चायना या तीन चिनी बॅंकांकडून कर्ज घेतले होते. मात्र हे वैयक्तिक कर्ज नाही,

यासाठी कोणतीही हमी अनिल अंबानी यांनी दिली नाही, असे रिलायन्सच्या प्रवक्‍त्यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात एका सुनावणीदरम्यान अनिल अंबानी यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले होते. मात्र हा युक्तिवाद न्यायाधीशांनी फेटाळला होता. अनिल अंबानी यांच्या ऑरकॉमवर 46 हजार कोटींचे कर्ज झाल्यामुळे कंपनीने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे. अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहावर कर्जाचा डोंगर उभा झाल्याने, अनेक उद्योग क्षेत्रातून त्यांनी माघार घेतली आहे. 

अब्जाधीशांच्या यादीबाहेर
2008 मध्ये अनिल अंबानी यांचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून फोर्बसच्या यादीत सहावे नाव होते. मात्र आता ते या अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. रिलायन्स उद्योगसमूहाच्या विविध कंपन्यांचा तोटा हे त्यामागील मुख्य कारण आहे. 

2018 मध्ये अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहावर 1.7 लाख कोटींचे कर्ज होते. कर्ज फेडण्यासाठी अंबानी यांनी उद्योगसमूहाच्या अनेक कंपन्या विक्रीला काढल्या आहेत. एका प्रकरणात अनिल अंबानी यांना अटक होण्यापासून त्यांचे बंधू मुकेश अंबानी यांनी वाचवले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com