सर्व जण म्हणत असतील "पंकजा कुठे आहे?''; त्यांनीच दिली महत्वाच्या 'रोल'ची माहिती

मी अगदी समर्पित भूमिका बजावत आहे, असं पंकजा यांनी म्हटलं आहे.
सर्व जण म्हणत असतील "पंकजा कुठे आहे?''; त्यांनीच दिली महत्वाच्या 'रोल'ची माहिती
Pankaja Munde is currently in Boston with his son

मुंबई : मागील आठवड्यात राज्याच्या राजकारणात मोठं वादळं उठलं होतं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. त्यानंतर भाजपच्या सर्वच नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. पण त्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे कुठेच दिसल्या नाहीत. मंदिरं उघडण्यासाठी सोमवारी राज्यभर आंदोलन झालं. तिथंही पंकजांच अस्तित्व नव्हतं. त्यामुळे त्या कुठे आहेत?, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांसह अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर पंकजा यांनीच दिलं आहे. (Pankaja Munde is currently in Boston with his son)

पंकजा या सध्या भारताबाहेर असल्याची माहिती त्यांनीच फेसबूक पोस्टमध्ये दिली आहे. पुढील 8 ते 10 दिवस त्या तिथेच असणार आहेत. फेसबुक पोस्टमध्ये त्या लिहितात, हा आठवडा नक्कीच सर्व जण म्हणत असतील "पंकजा कुठे आहे?"..  मी अगदी समर्पित भूमिका बजावत आहे!! आणि भूमिका ती मी नेहमी आवडीने बजावत असते.  माझ्या आर्यमन च्या आई च्या रोल मध्ये मी 100 टक्के आहे, किमान पुढचे 8 ते 10 दिवस.. आर्यमन आता #Boston मध्ये उच्च शिक्षण घेणार आहे.. मी त्याच्या hostel वर त्याला सोडण्यासाठी आले आहे.. आर्यमन ची 10 वी झाली, 12 वी झाली मी हवा तेवढा वेळ देऊ शकले नाही,10 वी च्या परीक्षा चालू होत्या एकही पेपर च्या साठी मी उपस्थित नव्हते, तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या.

आता लेकरू 4 वर्ष नाही म्हणुन संपूर्ण वेळ त्याला देत आहे.. म्हणुन कशावर काही टिप्पणी न करता बघते आहे राज्याच्या आणि देशाच्या घडामोडी .. तरीही इथे देखील घडले असे की मध्य प्रदेश च्या लोकांनी मला डाळ बाटी च्या कार्यक्रमासाठी बोलावले आणि मी प्रभारी असल्यामुळे हक्काने पोचले विदेशी वातावरणात आपल्या जेवणाच्या स्वादाची मजा वेगळीच आहे.. त्यांचे देशाच्या विषयी प्रेम आणि काही सेवा करण्याच्या इच्छा पाहून मी प्रभावित झाले.. खूप बोलले, अनेक कार्यक्रम ही ठरले. शेवटी इथे ही नाही म्हणाले तरीही बीजेपी च्या राष्ट्रीय सचिव या भूमिकेत, राजकारणाच्या भूमिकेत आलेच !! पण part time कारण priority आर्यमन आहेच, असं पंकजा यांनी म्हटलं आहे.

आज जन्माष्टमी साजरी होत आहे तिथे जात आहे... सर्वांना अभिमान वाटेल असा विषय म्हणजे इथे असणाऱ्या भारतीय लोकांनी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत त्याबद्दल मध्य प्रदेश मधली 75 गाव smart करण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे.. लहान मुलानी आपल्या pocket money मधून 75 cents पासून 75 dollar पर्यंत रक्कम रोज 75 दिवस जमा करून स्मार्ट एजुकेशन साठी गरज असणाऱ्या भारतीय मुलांना laptops किवा smartphone देण्याचा plan तयार केला आहे, असं पंकजा यांनी सांगितलं.

अनेक अश्या गोष्टी पाहून मी आनंदी झाले, नुसता भारतीय भोजनाचा स्वाद नाही तर देशाच्या अभिमानाचा गोडवा ही जिभेवर रेंगाळत आहे ... जय हिंद म्हणताना यांचे डोळे चमकताना पाहून माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या पण आनंदाने... माझा आर्यमन एकटा कसा राहील असं वाटत आहे पण इतके पालक मिळाले की हायसे वाटले, अशी भावनाही पंकजा यांनी व्यक्त केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in