Padalkar, don't follow the sham popularity, Manisha Kayande's advice | Sarkarnama

पडळकर, सवंग लोकप्रियतेच्या मागे लागू नका, मनीषा कायंदेंचा सल्ला 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 जून 2020

पडळकर हे नव्याने विधान परिषदेवर निवडून आले आहेत.

मुंबई : वादग्रस्त विधानं करून सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता आमदार गोपिचंद पडळकर यांनी जनतेच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे असा सल्ला शिवसेनेच्या प्रवक्‍त्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी दिला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात विधान परिषदेतील भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी ज्यापद्धतीने टीका केली आहे 
ती निषेधार्य आहे. ते नव्याने आमदार झाले आहे. प्रसिद्धीसाठी त्या अशाप्रकारेचे विधान करू नये असे कायंदे यांनी सामशी बोलताना सांगितले. 

त्या म्हणाल्या, की पडळकर हे नव्याने विधान परिषदेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी सांभाळून टीका केली पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीने शरद पवार यांच्याविरोधात टीका केली आहे. त्याप्रमाणे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करीत आहे.

पंढरपुरच्या विठ्ठल रुख्मिनीची पुजा करण्याबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. वास्तविक पुजा करण्याबाबतचा निर्णट मंदीर समिती घेत असते. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुजा करण्यात आल्या आहेत. तसेच सामान्य वारकऱ्यांनीही पुजा केली आहे. 

त्यामुळे पुजा करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील यामध्ये गोपिनाथ पडळकर यांनी अशा भानगडीत पडू नये असा सल्ला कायंदे यांनी त्यांना दिला आहे. 
दरम्यान, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे हे वादग्रस्त आणि निंदणीय विधान केल्याने सर्वत्र पडळकरांचा निषेध करण्यात येत आहे.अशा पद्धनीने टीका करणे शोभनिय नाही अशा प्रतिक्रियाही समाज माध्यमातून येत आहेत. शिवसेनेनेही गोपिचंद पडळकरांवर टीका केली आहे 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख