आमचं सरकार चांगलं काम करतंय, आगीत तेल टाकू नका ! वडेट्टीवारांचा सल्ला - Our government is doing a good job, don't add fuel to the fire! Vadettiwar's advice | Politics Marathi News - Sarkarnama

आमचं सरकार चांगलं काम करतंय, आगीत तेल टाकू नका ! वडेट्टीवारांचा सल्ला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 जून 2020

कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर कॉंग्रेसला विचारावा कारण तीन पक्षांच सरकार आहे.

मुंबई : आमचं महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे कोणीही आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करू नका असा कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना दिला आहे. 

आघाडी सरकारमधील कॉंग्रेसचे मंत्री गेल्या काही दिवसापासून नाराज आहेत. निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही असा नाराजीचा सूर कॉंग्रेसने लावला आहे. आघाडीत मतभेद आहेत ! सरकार अडचणीत आहे का ? असे प्रश्‍न मंत्री वडेट्टीवार यांना केला असता त्यांनी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि सरकार चांगले काम करीत असल्याचा निर्वाळा दिला. 

मुंबईत सामबरोबर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, की आमचं सरकार लोकहिताची कामं करत आहे. करोना संकटात लोकांना मदत करत आहे. तसेच कोकणाला निसर्ग वादळाचा तडाखा बसला आहे. तेथे विद्युत पुरवठा सुरू होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेस काही मुद्यावर नाराज आहे. काही निर्णय होत कॉंग्रेसला विचारात घेतलं जात नव्हतं. विचारात घेतले जावे इतकीच आमची मागणी आहे. बाकी सर्वकाही ठीक आहे. 

काही निर्णय होत असताना कॉंग्रेसला विचारात घेतल जात नव्हतं. विचारात घेतलं जाव एवढीच आमची मागणी होती असे सांगून ते म्हणाले, की तीन पक्षांचे सरकार आहे त्यामुळे सत्तेत समान वाटा मिळावा. ती मांडण्याची संधी आम्हाला द्यावी आणि समान न्याय व्हावा ही पक्षातील आमदार आणि नेत्यांची इच्छा आहे.

कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर कॉंग्रेसला विचारावा कारण तीन पक्षांच सरकार आहे. आमचं सरकार चांगलं काम करत आहे कोणी कितीही आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न केला तरीही काही होणार नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन पुढे जाण्याचा नाही तर थांबण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे कोणीही आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करू नये. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख