ज्या शिवसेनेने रेल्वेमंत्र्यांना शिंगावर घेतले त्या गोयलांना उद्वव ठाकरे म्हणाले, "" धन्ववाद !'' 

मात्र आज मुख्यमंत्री ठाकरेंचे गोयलांविषयी प्रेम उफाळून आले असून त्यांनी ट्रेन उपलब्ध करून दिल्याबद्दल गोयलांना धन्यवाद म्हणत आभार मानले आहेत.
ज्या शिवसेनेने रेल्वेमंत्र्यांना शिंगावर घेतले त्या गोयलांना उद्वव ठाकरे म्हणाले, "" धन्ववाद !'' 

पुणे : महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामध्ये स्थलांतरित मजुरांना आपआपल्या राज्यात सोडण्यासाठी केंद्रांने रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना विशेषत: मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आग्रही होते. पण, केंद्राने या गाड्या सोडण्याबाबत सहकार्य केले नाही अशी ओरड शिवसेनेने सुरू केली होती.

मात्र आज मुख्यमंत्री ठाकरेंचे गोयलांविषयी प्रेम उफाळून आले असून त्यांनी ट्रेन उपलब्ध करून दिल्याबद्दल गोयलांना धन्यवाद म्हणत आभार मानले आहेत. 

स्थलांतरित मजुरांना आपआपल्या राज्यात पाठविण्याबाबत "तू तू मै मै' सुरू होते. त्याबाबत काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडून पुरेशा ट्रेन उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली होती. अर्थात बोट केंद्रातील मोदी सरकारकडे होते. ठाकरेंच्या या आरोपामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल चांगले संतप्त होत. त्यांनी तुम्हाला हव्या तेवढ्या ट्रेन पाठवितो. प्रवासी तयार ठेवा असे ट्विट करून थेट आव्हान दिले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी यापूर्वी संवाद साधला होता. त्यांनी स्थलांतरित मजुरांचा प्रश्‍न पुन्हा उपस्थित केला होता आणि त्यांनी म्हटले होते, की महाराष्ट्राने मागणी करूनही हव्या तितक्‍या ट्रेन राज्याला मिळत नाहीत. त्यावर पियूष गोयल यांनी म्हटले होते, की उद्धवजी,आपल्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. तुम्ही म्हणाला आहे, की आमच्याकडे स्थलांतरित मजुरांची यादी तयार आहे. तसे असेल तर आम्ही उद्याच 125 ट्रेन महाराष्ट्रात पाठविण्यास तयार आहे. 

मध्य रेल्वे मुख्य व्यवस्थापकांशी एक तासाच्या आत आपण माहिती द्यावी आणि पाठविण्यात येणाऱ्या ट्रेन कुठे सोडायच्या आहेत. मेडिकल सर्टिफिेकट तयार आहेत का ? आपण तयारी केलीच असेल. त्यामुळे आम्ही लगेच ट्रेन्स पाठविण्याची व्यवस्था करू.जर एकदा ट्रेन आल्यानंतर त्या रिकाम्या जाणार नाहीत. आपण सांगाल तेवढ्या रेल्वे गाड्या पाठविण्यास तयार आहोत. 

पियूष गोयलांच्या या ट्विटनंतर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी गोयल यांच्यावर सडकून टीका केली होती. गोयल हे कसे चुकीचे वागतात. हे परब यांनी राज्याला सांगितले होते. त्यानंतर परब, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गोयल यांच्यावर निशाना साधला होता. त्यामध्ये शिवसेनेचे परब हे अधिक आक्रमक होते. 

रेल्वे गाड्या सोडण्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामना रंगला होता. पण आज ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयलांना धन्यवाद दिले असून रेल्येगाड्या सोडण्यात सहकार्य केल्याची भावना व्यक्त केली आहे. चार दिवसापुर्वी शिवसेनेने गोयलांवर हल्लाबोल केला होता. त्याच गोयलांना ठाकरे यांनी धन्यवाद दिले आहेत.म्हणजेच गोयलांनी महाराष्ट्रासाठी गाड्या उपलब्ध करून दिल्याने ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

ठाकरे आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले, की एसटीद्वारे पाच लाख पंचवीस हजार मजुरांना सीमेवर सोडले आहे. तसेच इतर राज्यातील 18 लाख मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यास रेल्वेने मदत केली आहे. तसेच राज्यात 7.50 लाख मजुर पुन्हा कामावर आले आहेत. ठाकरे यांनी अचानक आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये गोयलांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोयलांनी महाराष्ट्रासाठी किती गाड्या अधिक सोडल्या याचीच चर्चा आता होऊ लागली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com