राजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का? संजय राऊत यांचा सवाल - Is offence to Talk politics in Meeting between two leaders Ask Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

राजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का? संजय राऊत यांचा सवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

जेव्हा दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा त्यांच्यात देशाशी संबंधित विषयांवर चर्चा होते. शेतकरी विधेयक, जम्मू आणि काश्मीर, चीन, पाकिस्तान, कोविड १९ अशा विषयांवर चर्चा होणे स्वाभाविक आहे, असे संजय राऊत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले

मुंबई : दोन राजकीय नेते भेटल्यावर त्यांनी राजकीय चर्चा करणे हा गुन्हा आहे काय, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात गेल्या आठवड्यात चर्चा झाली. या चर्चेत राजकीय मुद्दे होते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची शनिवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. फडणवीस आणि राऊत यांची हाॅटेल ग्रॅड हयातमध्ये दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत ही भेट झाली. या वेळी भाजपकडून किंवा सेनेकडून इतर कोणीही नेते उपस्थित नव्हते. या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरु झाल्या.  ही भेट केवळ मुलाखती संदर्भात होती, असा दावा संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र,  

जेव्हा दोन राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते एकमेकांना भेटतात आणि चेव्हा दोन अडीच तास चर्चा करतात तेव्हा ते चहा-बिस्किटासारख्या विषयांवर नक्कीच बोलत नाही. त्यांच्यात राजकीय चर्चा होतेच. पण त्यातून निष्कर्ष काही निघत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते. त्यावर राऊत म्हणाले, "जेव्हा दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा त्यांच्यात देशाशी संबंधित विषयांवर चर्चा होते. शेतकरी विधेयक, जम्मू आणि काश्मीर, चीन, पाकिस्तान, कोविड १९ अशा विषयांवर चर्चा होणे स्वाभाविक आहे,''

मात्र या विषयावर चंद्रकांत पाटील यांनी आज खुलासा केला आहे. ''संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना सामनामधील मुलाखतीसंदर्भात विचारले होते. या मुलाखतीत काही वादग्रस्त प्रश्न नसावेत, यासाठी आपण एकत्र भेटू असेही राऊत फडणवीसांना म्हणाले होते. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली नाही. कारण भेटीचा तो उद्देशच नव्हता, असे मी काल म्हणालो होतो." असे पाटील म्हणाले."
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख