मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सध्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना टार्गेट बनवले आहे. आता सेनेचेच माजी खासदार व सिटी को-आॅपरेटिव्ह बँकेचे आनंदराव अडसूळ हे सोमय्यांचे पुढचे लक्ष्य आहे. या बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात आपण रिझर्व बँकेकडे तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
संजय राऊत परिवाराप्रमाणेच आणखी एका शिवसेना नेत्याची चौकशी करण्याची मागणी काही वेळापूर्वीच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. हा नेता म्हणजे आनंदरवा अडसूळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना सोमय्या म्हणाले, "बॅंकिंग क्षेत्रात जे खूप मोठ्या बाता करतात त्यांच्याकडे पीएमसी बॅकेचे पैसे पोहोचले आहेत. काही महिन्यापुर्वी सिटी बॅंकेचे गुंतवणुकदार आले होते, आनंदराव अडसूळ यांचा विषय आम्ही तिथे घेऊन जाणार आहोत. आनंदराव आडसुळांबद्दल आम्ही रिझर्व बॅंकेला कळवणार आहोत. घोटाळे त्यांनी केले आणि उलट आमच्यावर आरोप करत आहेत,''
किरीट सोमय्या यांचा खळबळजनक आरोप#राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/RtfMY9bnH0
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 5, 2021
'' पीएमसी बॅंक असो की सीटी बॅंक दोषींवर कारवाई होणारच. ईडीच्या चौकशीत दोन जणांची नाव समोर आली आहेत. संजय राऊत ह्यांचा घेटाळा कितीचा आहे, हे लवकर समजेल. प्रताप सरनाईक यांनी १३ हजार खातेधारांचे पैसे ढापले आहेत. संजय राऊतांचा चेहरा पाहिल्यानंतर आता बस्स करा असंच वाटलं. ठाकरे कुटूंबाला भीती वाटते त्यामुळे सामनाची भाषा बदलली आहे. ते आत्ता कोरोनाची बात करत आहेत. सेनेची दयनीय अवस्था झाली आहे,'' असेही सोमय्या म्हणाले.
शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजराती समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. त्याबेबत ते म्हणाले, "शिवसेनेने गुजराती कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पण कितीही काही झालं तर लक्ष डायव्हर्ट होऊ देणार नाही. जर चोरी केलीय तर चौकशी होणारच. लक्ष डायव्हर्ट करून काहीही होणार नाही,''
Edited By - Amit Golwalkar

