महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हा एकच 'ब्रँड' - नितेश राणे - Nitesh Rane Tweets against Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हा एकच 'ब्रँड' - नितेश राणे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

महाराष्ट्रात ठाकरे हा एकच ब्रँड असायला हवा, या शिवसेना मुखपत्र 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरवरुन घेतला आहे

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे हा एकच ब्रँड असायला हवा, या शिवसेना मुखपत्र 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरवरुन घेतला आहे. मुंबई असो कि महाराष्ट्र.. एकच ब्रँड.. छत्रपती शिवाजी महाराज!!, असे म्हणत राणे यांनी संजय राऊत व शिवसेनेला टोला लगावला आहे.

'ठाकरे' हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा 'ब्रॅण्ड' पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच  'ब्रॅण्ड' चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात 'ठाकरे' ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी 'ठाकरे' ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'तून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. त्यावर राणे यांनी ट्वीट करत राऊत यांना सुनावले आहे. 

संबंधित लेख