यांच्या मुलांची लग्नेही आमच्याच पैशांनी होणार? नितेश राणेंचा शिवसेनेला टोला - Nitesh Rane Hits out at Shivsena over Kangana Case Legal Expenses | Politics Marathi News - Sarkarnama

यांच्या मुलांची लग्नेही आमच्याच पैशांनी होणार? नितेश राणेंचा शिवसेनेला टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत हिने महापालिकेविरोधात दाखल केलेल्या खटल्यातील वकिलाच्या शुल्कापोटी पालिका प्रशासनाने आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च केले आहेत. त्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर ट्वीटरच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने महापालिकेविरोधात दाखल केलेल्या खटल्यातील वकिलाच्या शुल्कापोटी पालिका प्रशासनाने आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च केले आहेत. त्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर ट्वीटरच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. 'यांच्या' मुलांची लग्नेही आमच्याच पैशांनी होणार, असे ट्वीट करत राणेंनी शिवसेनला चिमटा काढला आहे. 

माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळवण्यात आली आहे. कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर पालिकेने एक दिवसाची नोटीस देऊन कारवाई केली होती. ती सुरू असतानाच कंगनाने न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतचा खटला सध्या उच्च न्यायालयात सुरू आहे. खटल्यात बाजू मांडण्यासाठी महापालिकेने ज्येष्ठ विधिज्ञ अस्पी चिनॉय यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या शुल्कापोटी पालिकेने आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत त्याबाबत माहिती मिळवली आहे.

यावर नितेश राणेंनी ट्वीट केले आहे. Wow! Mumbaikers pay tax for.. 1.)Penguins
2.)lawyers for Kanganas case ..What else is left???
(मुंबईचे रहिवाशी कर कशासाठी भरतात? १) पेंग्विन २) कंगनाच्या खटल्यात वकिलांवर) असे राणे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी काल नितेश राणे व नारायण राणेंवर टीका केली. नाईक मातोश्रीच्या अंगणात तुळशी वृंदावनच आहे. मात्र, गांजाची शेती कुणाच्या अंगणात पिकते याची विचारणा नीतेश राणेंनी आपल्या मोठ्या भावाकडे करावी. त्वरित त्याचा उलगडा होईल, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला.
Edited By- Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख