चीन सोडा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा : निलेश राणेंचा टोला - Nilesh Rane Ridicules Rahul Gandhi over remarks about china | Politics Marathi News - Sarkarnama

चीन सोडा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा : निलेश राणेंचा टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

आमचे सरकार केंद्रात असते तर आम्ही चीनच्या सैन्याला १५ मिनिटांत आमच्या भूभागावरुन बाहेर काढले असते असे वक्तव्य काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी कुरुक्षेत्र येथे काल केले होते. त्यावर निलेश राणे यांनी ट्वीट करुन टीका केली आहे

मुंबई : राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असते. चीनचे राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा, असा सणसणीत चिमटा माजी खासदार निलेश राणे यांनी काढला आहे.

आमचे सरकार केंद्रात असते तर आम्ही चीनच्या सैन्याला १५ मिनिटांत आमच्या भूभागावरुन बाहेर काढले असते असे वक्तव्य काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी कुरुक्षेत्र येथे काल केले होते. चीन प्रश्न हाताळण्यात अपयश आल्याबद्दल राहुल यांनी मोदी सरकारवर या भाषणात टीका केली होती. त्यावर निलेश राणे यांनी हा चिमटा काढला आहे. ''राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए. के. अँटनी रक्षामंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती. पण ए.के. अँटनीनी हसत उत्तर दिले होते की, आमच्या चर्चा सुरू आहेत, चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार??, असेही निलेश राणे यांनी ट्वीट करुन म्हटले आहे.

संबंधित लेख