बारामतीचे विक्रम खलाटे करणार सचिन वाझेंकडे तपास - NIA SP Vikram Khalate to Probe Antellia Bomb Matter | Politics Marathi News - Sarkarnama

बारामतीचे विक्रम खलाटे करणार सचिन वाझेंकडे तपास

सुरज सावंत
रविवार, 14 मार्च 2021

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काल रात्री अटक केली आहे. तत्पूर्वी सुमारे 10 तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली

मुंबई : अंबानी स्फोटके प्रकरणात मुख्य तपास अधिकारी म्हणून आयपीएस विक्रम खलाटे काम पहात आहेत. आयपीएस विक्रम खलाटे हे सध्या NIA मुंबईचे अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. काल दिवसभरात वाझेंची चौकशीही त्यांनीच केली होती. त्यानंतर वाझेंना अटक करण्यात आली.  विक्रम खलाटे हे बारामतीमधील लाटे गावचे असून २००८ - २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काल रात्री अटक केली आहे. तत्पूर्वी सुमारे 10 तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली. दुसरीकडे या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनेही "जैश उल हिंद' दहशतवादी संघटनेच्या तिहार कनेक्‍शनचा तपास सुरू केला असून त्यांचे पथक लवकरच मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या स्फोटके प्रकरणाचा तपास खलाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या जेट एअरवेज विमानाच्या हायजॅकिंग प्रकरणाचा तपासही विक्रम खलाटे यांनी केला होता. (२०१६ च्या अँटी हायजॅकिंग ऍक्टनुसार हा तपास NIA ने केला होता). आजवर अनेक प्रकरणात विक्रम खलाटे यांनी उत्कृष्ट तपास केल्यामुळे त्यांना केंद्रीय गृहखात्यातर्फे देण्यात येणाऱ्या युनियन होम मिनिस्टर मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. खलाटे हे भीमा कोरेगाव प्रकरणाचे NIA चे मुख्य तपास अधिकारीही आहेत.

दरम्यान, सचिन वाझे यांची तब्येत काल बिघडली होती. त्यानंतर त्यांना उपचार देण्यात आले आहेत.त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं. त्यांना चौकशी दरम्यान थकवा जाणवत होता. यामुळे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय चाचणी करून त्यांना पुन्हा एन आय ए ऑफिस मध्ये आणण्यात आले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख