मनसुख हिरेन हत्या प्रकरण : सचिन वाझेंची डीएनए चाचणी होणार - NIA to Conduct DNA Test of Sachin Waze | Politics Marathi News - Sarkarnama

मनसुख हिरेन हत्या प्रकरण : सचिन वाझेंची डीएनए चाचणी होणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मार्च 2021

मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवणे तसेच मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणात संशयित आरोपी निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे, बडतर्फ काँन्स्टेबल विनायक शिंदे, बुकी नरेश गोरे व अन्य काही जणांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवणे तसेच मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणात संशयित आरोपी निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे, बडतर्फ काँन्स्टेबल विनायक शिंदे, बुकी नरेश गोरे व अन्य काही जणांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एनआयए अधिकारी (NIA)या सर्वांचे डिएनए नमुने घेऊन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत गेल्याची माहिती मिळत आहे. (NIA to Conduct DNA Test of Sachin Waze)

या प्रकरणात ज्या गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्या गाड्यांमधून फोरेन्सिक टीमला मिळालेल्या पुराव्यामधील डीएनए व संशयित आरोपींचे डिएनए (DNA)यांची पडताळणी करण्यात येणार आहे. हा अहवाल एक ते दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्येच्या गुन्ह्यांमध्ये दोन मर्सिडिज, एक इनोव्हा वापरली गेली, असा संशय आहे. एनआयएने ताब्यात घेतलेल्या व्होल्व्हो व प्राडो या दोन गाड्यांमधूनही फाॅरेन्सिक टीमने नमुने घेतले आहेत. 

दरम्यान, वाझे (Sachin Waze)ज्या विभागात नेमणुकीला होती त्या सीआययू (CIU) पथकाला बार आणि हाॅटेलवर कारवाईचे अधिकार नव्हते. मात्र, गुन्हा घडला त्या ठिकाणी आपण उपस्थित नव्हतो हे दर्शवण्यासाठीच वाझेंनी डोंगरीत हाॅटेलवर कारवाई केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर त्यांची ओळख पटू नये म्हणून अंगावरील सर्व मौल्यवान वस्तू काढून घेऊन त्यांची हत्या लुटीच्या कारणासाठी झाल्याचा बनाव संशयित आरोपींनी रचला. पुरावा नष्ठ करण्यासाठी मनसुखच्या दुकानातील  सीसीटिव्हीचा डिव्हीआर वाझेंच्या पथकातील पोलिसांनी २७ तारखेलाच काढून नेत त्या ठिकाणी नवीन डीव्हीआर आणून लावला, अशीही माहिती तपासात मिळत आहे.
(NIA to Conduct DNA Test of Sachin Waze)

दरम्यान, अँटिलिया बाँब प्रकरणात ज्या व्यक्तीच्या गाडीचा वापर झाला त्या मनसुख हिरेन यांना ठार मारण्यासाठी क्लोरोफाॅर्मचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. हिरेन यांना गाडीतच क्लोरोफाॅर्म वापरुन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तोंडात रुमाल कोंबून खाडीत फेकण्यात आले, अशी माहिती एनआयएला सचिन वाझे व अन्य संशयितांच्या तपासात मिळाली आहे. ज्यावेळी मनसुख हिरेन यांची हत्या झाली तेव्हा संशयित आरोपी विनायक शिंदेही तिथे होता, असेही एनआयएला समजले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख