Sharad Pawar taking Second dose of Corona Vaccine
Sharad Pawar taking Second dose of Corona Vaccine

शरद पवारांनी घेतला कोरोना लशीचा दुसरा डोस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. डोस घेतल्यानंतर ट्वीट करत पवार यांनी डाॅ. तात्याराव लहाने त्यांचे वैद्यकीय पथक तसेच लशीचे दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे आभार मानले आहेत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी आज कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. डोस घेतल्यानंतर ट्वीट करत पवार यांनी डाॅ. तात्याराव लहाने त्यांचे वैद्यकीय पथक तसेच लशीचे दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे आभार मानले आहेत. NCP Chief Took Second dose of Corona Vaccine in Mumbai

योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची Covid Vaccine प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या Virus लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा. संपूर्ण जग गेले वर्षभर कोरोना विषाणूशी लढा देत आहे. बदलत्या परिस्थितीत आव्हानांना सामोरं जाताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्कचा वापर करा. सुखी व निरोगी आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा!, असे पवार यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून विषाणूंचा वेगाने फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही सूचना वजा आवाहन करणारे पत्र लिहिले आहे. 

या पत्राचा संदर्भ घेत खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनीही राज्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन केले.''राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. हे लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृपया हा तुटवडा दूर करण्यासाठी राज्यात जेथे शक्य असेल, त्या त्या प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिरे Blood Donation घ्यावीत. आपण एकमेकांना सहकार्य करुन परस्पर सहकार्य व सामंजस्याने एक समाज म्हणून या संकटाचा सामना करु. कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा एकदा आपण नव्या क्षितिजाकडे झेपावू," असे सुळे यांनी म्हटले आहे. NCP Chief Took Second dose of Corona Vaccine in Mumbai

श्री. पवार यांनी आपल्या पत्रात म्हटल्यानुसार  प्रशासकीय यंत्रणांनी वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यासोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या तत्वाचे काटेकोर पालन करा, असेही आवाहन सुळे यांनी केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com