परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर आज राष्ट्रवादीची दिल्लीत तातडीची बैठक

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे
NCP to held urgent meeting of Leaders in New Delhi
NCP to held urgent meeting of Leaders in New Delhi

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर  गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे. (NCP Cheif Sharad Pawar Called Urgent Meeting of NCP in Delhi)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेण्यात आले आहे. या बैठकीत परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री बदलण्याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला अनिल देशमुख उपस्थित राहणार का, हे मात्र अद्याप समजलेले नाही. 

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीरसिंग (Parambirsingh) यांची उचलबांगडी करण्यात आली होती. आता परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट पत्र लिहिले असून, यात गृहमंत्र्यावरच खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. (NCP Cheif Sharad Pawar Called Urgent Meeting of NCP in Delhi)

दरम्यान, खंडणीखोर गृहमंत्री राजीनामा द्या! या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने उद्या रविवार २१ मार्च २०२१ रोजी सकाळी साडेदहा वाजता भाजपा प्रदेश कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनास विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com