NCP And Shivsena Meeting Before Cabinet Today | Sarkarnama

शिवसेना राष्ट्रवादीत प्रेमाच्या आणाभाका; मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी ठाकरे स्मारकात भेट 

गुरुवार, 23 जुलै 2020

रायगड जिल्हा ही आता सेना आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षातील सत्ता समीकरणाची नांदी ठरणार आहे. दोन्ही पक्षांनी या पुढे एकदिलाने काम करायचे ठरले आहे. अलिबाग परिसरात शेकापने सध्या राष्ट्रवादीच्या समवेत रहायचे ठरवले होते पण नव्या सत्ता समीकरणात दोघांनी एकदिलाने काम करायचे ठरले आहे

मुंबई  : महाराष्ट्राच्या राजकारणात या पुढे शिवसेनेने व राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आज बाळासाहेब ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीला सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर आणि सुनिल तटकरे उपस्थित होते.

अलिबाग जिल्हयात उभय पक्षात निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी ही बैठक झाली. कार्यकर्त्यांनी परस्परांवर कुरघोडी सुरु ठेवल्याने या जिल्हयात कमालीचा ताण आहे. आज भारत गोगावले, महेंद्र थोरवे महेंद्र दळवी या सेना तर पालकमंत्री आदिती तटकरे ,अनिकेत तटकरे सुरेश लाड यांच्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी समेटाची बैठक घडवून आणली. त्या त्या आमदारांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ न करता कामे करावीत, असे ठरले.

रायगड जिल्हा ही आता सेना आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षातील सत्ता समीकरणाची नांदी ठरणार आहे. दोन्ही पक्षांनी या पुढे एकदिलाने काम करायचे ठरले आहे. अलिबाग परिसरात शेकापने सध्या राष्ट्रवादीच्या समवेत रहायचे ठरवले होते पण नव्या सत्ता समीकरणात दोघांनी एकदिलाने काम करायचे ठरले आहे. या लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात काटे की टक्कर झाली होती. ही स्पर्धा संपवून आता साहचर्याचे युग निर्माण करायचे ठरले आहे.हा ऐक्यप्रयोग यापुढे महाराष्ट्रात सर्वत्र राबवला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परस्परांच्या जवळ आले असून ही युती राज्याचे नवे भवितव्य ठरू शकेल.
(Edited By - Amit Golwalkar)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख