बापरे ! मलिक म्हणतात,"" तीन महिन्यात 17 हजार बेरोजगारांना नोकरी दिली !'' 

मागील 3 महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविधव्यासपीठांवर 1 लाख 72 हजार 165बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली
 बापरे ! मलिक म्हणतात,"" तीन महिन्यात 17 हजार बेरोजगारांना नोकरी दिली !'' 

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही मागील 3 महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत तब्बल 17 हजार 715 बेरोजगारांना नोकरी मिळवून दिला आहे. 

मागील 3 महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविधव्यासपीठांवर 1 लाख 72 हजार 165बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून या सर्वउमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगडघालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.inहे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात.

त्याचबरोबर कुशलउमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्‌स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणीकरुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजकयांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते. 

मागील 3 महिन्यात एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर 2 लाख 72 हजार 165इतक्‍यानोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई विभागात 24हजार 520, नाशिक विभागात 30हजार 145, पुणे विभागात 37 हजार 562, औरंगाबाद विभागात35 हजार 243, अमरावती विभागात 14 हजार 260 तर नागपूर विभागात 30 हजार 436 इतक्‍या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यापैकी 17हजार 133 उमेदवारांना नोकरीमिळविण्यात यश आले असून यात मुंबई विभागातील 3 हजार 720, नाशिक विभागातील 482, पुणे विभागातील 10 हजार 317, औरंगाबाद विभागातील 1हजार 569, अमरावती विभागातील 1 हजार022 तर नागपूर विभागातील 23उमेदवारांचा सहभाग आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य कौशल्यविकास सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून 582उमेदवारांना रोजगार मिळवून दिला आहे. 

40 हजार नोकरीइच्छूक सहभागी 
कौशल्य विकास विभागाने मागील तीन महिन्यात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईनरोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. मागील 3 महिन्यात 24 ऑनलाईन रोजगार मेळावे संपन्न झालेअसून उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच मेळावे होणार आहेत. झालेल्या मेळाव्यांमध्ये 167उद्योजकांनी सहभाग घेतला.

त्यांच्याकडील 16 हजार 117 जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखतीघेतल्या. या मेळाव्यांमध्ये40 हजार 229 नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत 2 हजार 140 तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधूननिवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्नकरण्यात येत आहेत, असे मलिक यांनी सांगितले. 

नोकरीइच्छूक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन 
मलिक म्हणाले "" यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फतमोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.inया वेबपोर्टलवर नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी,तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले उद्योजक, कॉर्पोरेट्‌स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com