उद्यापासून हिवाळी अधिवेशनास सुरवात..भाजप कोणत्या प्रश्नांवरून सरकारला घेरणार... - mumbai two day session legislature will begin tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

उद्यापासून हिवाळी अधिवेशनास सुरवात..भाजप कोणत्या प्रश्नांवरून सरकारला घेरणार...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 डिसेंबर 2020

महिला व बालकल्याण अत्याचाराबाबतच्या शक्ती कायदा विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. 

मुंबई : विधीमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात उद्यापासून (ता.14) सुरवात होणार आहे. महिला व बालकल्याण अत्याचाराबाबतच्या शक्ती कायदा विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. 

हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. कोरोनाच्या संकटामुळे हे अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ कामकाज सल्लागार समितीने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारला नुकतेच वर्ष पू्र्ण झाले आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निव़डणुकीमुळे महाविकास आघाडी सरकारला विजय मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात विरोधी पक्ष भाजप सरकारला कोणत्या प्रश्नांवर घेरणार हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी हे अधिवेशन 7 डिसेंबरला घेण्यात येणार होते.

हिवाळी अधिवेशन मुंबईत झाल्यास उपराजधानीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले नागपुरात अधिवेशनासाठी आग्रही असल्याने सरकारकडून मार्चच्या अधिवेशनाची तयारी दर्शवण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे समजते.

शेतकरी मरत आहे. त्याला कुणी वाचविणार आहे काय ? 
मुंबई : कृषी कायद्यावरून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मोदींचे सरकार हे तीन कायदे घेऊन आले. या कायद्यांची काळी बाजू काय ते निदान महाराष्ट्राने तरी समजून घेतले पाहिजे. शेतकऱ्यांसंदर्भातले नवे कायदे हे मर्जीतल्या बड्या उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी बनवले. शेतकरी ज्या कायद्यांच्या विरोधात उभा ठाकला आहे, त्या तीन कायद्यांची  माहिती किती जणांना आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची याचना कवडीमोलाची ठरत आहे. शेतकरी मरत आहे. त्याला कुणी वाचविणार आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी 'सामना'तील 'रोखठोक'मधून उपस्थित केला आहे. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे देशातील शेतकऱ्यांच्या भावना नाहीत हा अपप्रचार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून जे तीन कायदे मोदी सरकारने आणले ते नक्की काय आहेत? ते कायदे म्हणजे शेतीचे थडगे व शेतकऱ्यांचे मरण आहे असे ज्यांना वाटते, त्यांनी हा विषय लोकांना समजावून सांगायला हवा, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख