परमबीरसिंग यांच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीचा उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक सीबीआय चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
Parambir Singh - Anil Deshmukh
Parambir Singh - Anil Deshmukh

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआयने (CBI) प्राथमिक चौकशी करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. Mumbai High Court orders CBI Inquiry on Allegations of Parambirsingh on Anil Deshmukh

परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबईच्या अॅड. जयश्री पाटील यांनी न्यायालयात देशमुख तसेच वाझे यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी रिट याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

सीबीआयने येत्या १५ दिवसांत चौकशी करुन न्यायालयाला अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात चौकशी करावी, सध्या गुन्हा दाखल करु नये किंवा जयश्री पाटील यांची तक्रारही नोंदवून घेऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सीबीआयच्या संचालकांनी येत्या १५ दिवसांत ही चौकशी पूर्ण करावी व त्यानंतर पुढील निर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात दाखल झालेल्या अन्य दोन याचिकाही न्यायालयाने फेटाळल्या. जयश्री पाटील (Jayashtree Patil) यांनी सीबीआय चौकशीच्या आदेशाचे स्वागत केले आहे.

ज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना (Sachin Waze) निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते. Mumbai High Court orders CBI Inquiry on Allegations of Parambirsingh on Anil Deshmukh

त्यानंतर परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्या चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावेळी न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. त्यानंतर परमबीरसिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती न्यायालयाने आज फेटाळली.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com