धक्कादायक - भाजपचा 'तो' पदाधिकारी बांगलादेशीच - Mumbai BJP Office Bearer found to be Bangladesh Resident | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक - भाजपचा 'तो' पदाधिकारी बांगलादेशीच

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

तपासादरम्यान रुबेल जोनू शेखच्या घरात पश्‍चिम बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, उत्तर परगणाचा रहिवासी दाखला तसेच नादिया जिल्ह्यातील बोलगंडा आदर्श हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखल मिळाला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन चौकशी केली असता रुबेल जोनू शेख या नावाने कोणालाही रहिवासी दाखला ग्रामपंचायतीने दिला नसल्याचे समोर आले आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

मुंबई  : भारतीय जनता पक्षाचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत रुबेल जोनू शेख बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले असून त्याला अटक केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.

तपासादरम्यान रुबेल जोनू शेखच्या घरात पश्‍चिम बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, उत्तर परगणाचा रहिवासी दाखला तसेच नादिया जिल्ह्यातील बोलगंडा आदर्श हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखल मिळाला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन चौकशी केली असता रुबेल जोनू शेख या नावाने कोणालाही रहिवासी दाखला ग्रामपंचायतीने दिला नसल्याचे समोर आले आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. भाजपने कोणतीही शहानिशा न करता त्याला पद कसे दिले. बेकायदा घुसखोरी करून मुंबईत राहणाऱ्या अशा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काही समाजविघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का, असा प्रश्‍नसुद्धा महेश तपासे यांनी उपस्थित केला होता. तसेच ही बाब गंभीर असल्याने त्याची चौकशी करण्याबाबतचे निवेदन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले होते. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

दाखल्यावरील शाळाच अस्तित्वात नाही!
शाळेच्या दाखल्याबाबत पोलिसांनी पश्‍चिम बंगालमधील नादिया जिल्हा शाळा निरीक्षकांजवळील नोंदी तपासून पाहिल्या असता दाखल्यात नमूद केलेली शाळा अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले. याच सर्व खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्याने आधार कार्ड व पॅनकार्डसुद्धा काढल्याचे तपासात समोर आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख